

पुणे: श्रावण संपल्यानंतर आणि गणेशोत्सवाच्या तोंडावर पुणेकरांनी मांसाहाराला पसंती दिली. शुक्रवार ते रविवार या तीन दिवसांत मटण, मासळी आणि चिकन खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी झाली. पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरून मासळीची मुबलक आवक होत असल्याने पापलेट आणि रावस वगळता अन्य मासळीचे दर स्थिर आहेत.
पापलेट, सुरमई आणि रावसचे भाव मात्र तेजीत आहेत. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने मटणाच्या भावात किलोमागे ४० रुपयांची वाढ झाली. चिकनचा पुरवठा अधिक असल्याने भाव किलोमागे १० रुपयांनी घटल्याचे दिसून आले. तर, इंग्लिश अंड्यांच्या भावात शेकड्यामागे ४० रुपयांची वाढ झाली असून, गावरान अंड्यांचे भाव स्थिर आहेत. गणेश पेठ येथील घाऊक बाजारात रविवारी (दि. १३) खोल समुद्रातील मासळी २० ते २५ टन, खाडीच्या मासळीची ५०० किलो आणि नदीच्या मासळीची ५०० ते ७०० किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून २० ते २५ टन इतकी आवक झाली.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर):
पापलेट : कापरी : १८००-२०००, मोठे : १४००-१५००, मध्यम : १२००-१३००, लहान : २००-१०००, मिला : ७००-८००, हलवा : ६००-७००, सुरमई ५००-७००, रावस: ८००-९००, घोळ : ७००-८००, करली: ४००-४५०, मिंग: ४००-५००, पाला : २००-१४००, वाम: पिवळी ६००-७००, काळी : ३००-४००, ओले बोंबील १००-१८०.
कोळंबी लहान : १४०-२८०, मध्यम : ३२०-४८०, मोठी: ५५०-६५०, जम्बो प्रॉन्स : १५००, किंग प्रॉन्स ८००, लॉबस्टर : २०००-२२००, मोरी : ३००-४००, मांदेली १४०-१६०, राणीमासा: २२०-२८०, खेकडे : ३००-४००, चिंबोऱ्या: ५५०-६५०. खाडीची मासळी - सौंदाळे : २२०-२८०, खापी: २२०-२८०, नगली: ४००-४८०, तांबोशी : ४००-५००, पालू: २५०-३००, लेपा: २५०-३००, बांगडा : २५०-३००, शेवटे : २००-२५०, बेळुंजी १२०-१८०, तिसऱ्या: २५०-३००, खुबे : १२०-१६० तारली २५००-३००.
नदीतील मासळी: रहू: १४०-१८०, कतला : १८०-२४०, मरळ : २८०-३६०, शिवडा: २००-२५०, खवली : २००-२५०, आम्ळी: ८०-१४०, खेकडे: २५०-४००, वाम : ४००-४५०. मटण : बोकडाचे ८४०, बोलाईचे ८४०, खिमा ८४०, कलेजी ८८०. चिकन २००, लेगपीस २५०, जिवंत कोंबडी १४०, बोनलेस ३००. अंडी: गावरान (शेकडा) ११२० डझन १४०, प्रतिनग १२. इंग्लिश (शेकडा) ६००, डझन ८४, प्रतिनग ७.