Pune Rains Pudhari
पुणे

Pune Rains: पुण्यात अवकाळीचे तांडव, दोन तासांत इतका पाऊस पडला; एप्रिलमधील विक्रमी नोंद

खडकवासला, कात्रज, डेक्कनमध्ये विक्रमी पाऊस; झाडपडी, वीज खंडित, दुचाकी वाहून गेल्या

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे,पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातील बहुतांश भागात गुरुवारी अवकाळी पावसाने अक्षरशः तांडव घातले दुपारी दोन वाजता सुरु झालेला पाऊस थांबायचे नावच घेत नव्हता सुमारे दोन तास एकाच वेगाने झालेल्या पावसाने शहरात दाणादाण उडवून दिली.रसत्यांना पूर आला त्यामुळे वाहने त्यात अडकली.पावसाळ्यातही पडत नाही इतका मोठा अवकाळी पाऊस शहरात झाला.शहरात सर्वंच भागात जोरदार विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाल्याने नागरीकांना धडकी भरली होती.सर्वाधिक पाऊस खडकवासला ८८,कात्रज परिसर ८३,डेक्कन ७९ मिलीमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली.

शहर आणि परिसरात गुरुवारी लागोपाठ दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने अक्षरशः तांडव घातले.पावसाचा जोर इतका जबदस्त होता.रस्त्यांना पूर आल्याने सर्व प्रकारची वाहने जागेवरच थांबली.चारचाकी वाहनाच्या काचेतून समोरचे काहीच दिसत नव्हते.त्यामुळे अनेक वाहने पुरात अडकली.अनेक दुचाकी वाहून जाताना दिसत होत्या कात्रज भागात अनेक दुचाकी वाहून जाताना दिसल्या.नागरीकांनी त्याचे व्हिडीओ व्हायरल केले.सर्वाधिक पाऊस खडकवासला,कात्रज, डेक्कन परिसर, पाषाण,लोहगाव,शिवाजीनगर भागात झाला.शहरातील सर्व पेठा आणि उपनगर भागाला पावसाने अक्षरशः झोडपून काढले.दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत लोक दुकाने,हॉटेलसह मिळेल तो आडोसा शोधून थांबले होते.मात्र वाऱ्याचा वेग इतका होता की आडोशाला थांबलेले लोकही चिंब भिजले.छत्री,रेनकोट नसल्याने अनेकांना चिंब भिजत घर,कार्यलय गाठावे लागले.

झाडपडी,घरे दुकानांत पाणी,दुचाकी वाहून गेल्या....

वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० कि.मी होता आणि विजांच्या कडकडाटांचा आवाज प्रचंड होता.त्यामुळे लोकांना धडकी भरावी असे वातावरण तयार झाले होते.सुमारे दोन अडचि तास रस्त्यावर पाऊस पडत होता.त्यामुळे शहरातील बहुतांश भागात झाडपडीच्या अनेक घटना घडल्या,काही ठिकाणी पत्रे उडून गेले.तर अनेक दुचाकी,चारचाकी वाहने पुरात अकडकली होती.दुचाकी वाहने वाहून बस,ट्रक खाली अडकली होती.कात्रज,डेक्कन,पाषाण,शिवाजीनगरसह उपनरांत अवकाळी पावसाचे रौद्ररुप दिसून आले.सायंकाळी ५ पर्यंत पाऊस सुरुच होता.त्यानंतर पूर्ण थांबला.दुपारी २ ते ५ पर्यंत शहर काळोक होता कारण ढगांची दाटी झाली होती.

अनेक भागात विज गुल...

या पावसामुळे दुपारी २ ते ४ या वेळेत विजेचा लंपडाव सुरु होता.त्यामुळे हॉलेट,दुकानांत आडोशाला थांबलेल्या लोकांची धावपळ झाली.शहरातील बहुतांश भागात विजेचा लपंडाव सुरु होता.अखेर सायंकाळी ५ वाजता ही स्थिती सुरळीत झाली.मात्र सखल भागांत तळी साचली अन हवेत प्रचंड गारठा निर्माण झाला होता.

गुरुवारी दुपारी ४ पर्यंत झालेला पाऊस..

  • खडकवासला ----८८

  • कात्रज-------८३

  • डेक्कन -----७९

  • पाषाण-----४६

  • लोहगाव----३६.२

  • शिवाजीनगर ---३०

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT