Driving License Pudhari
पुणे

Pune Traffic Fine License Suspension Warning: वाहतूक दंड न भरल्यास परवाना निलंबित होणार! पुणे पोलिसांचा इशारा

30 दिवसांत थकीत दंड न भरल्यास आरटीओकडे प्रस्ताव; 26 ते 1 मार्चदरम्यान अधिकृत एसएमएस नोटीस, फसव्या मेसेजपासून सावध राहा!

पुढारी वृत्तसेवा

पुणे: वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांच्या विरुद्ध वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. तसेच वाहनांवरील थकीत दंडाची रक्कम 30 दिवसांच्या आत जमा न केल्यास, वाहन परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन विभागाला (आरटीओ) पाठवला जाणार आहे, अशा इशारा पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागाने दिला आहे.

त्यामुळे नागरिकांनी वाहनावरील थकीत दंडाची रक्कम चौकात वाहतूक नियमनासाठी थांबलेल्या पोलिस अंमलदारांकडे जमा करावी, असेही आवाहन पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी केले आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करूनही दंड न भरलेल्या वाहनमालकांना अधिकृत नोटीस पाठवण्यात येत आहे.

त्यानुसार संबंधितांनी 30 दिवसांच्या आत दंड भरणे आवश्यक असल्याचे वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे. दंड न भरल्यास वाहन चालकाचा वाहन परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव आरटीओकडे पाठवला जाणार आहे. तसेच प्रकरण न्यायालयात दाखल करण्याचीही कारवाई केली जाईल. त्यामुळे वाहनधारकांनी थकीत दंडाकडे दुर्लक्ष न करता तत्काळ दंड भरावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान, 26 ते 28 फेबुवारी आणि 1 मार्च कालावधीतच पोलिसांकडून नोटीस पाठवली जाणार आहे. त्यानंतरच्या मेसेजकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले आहे.

...अशी येणार नोटीस

वाहन मालकांना ही नोटीस त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एमएचपीईसीएच-जी या अधिकृत शॉर्ट कोडवरून एसएमएसद्वारे पाठविण्यात येणार आहे. ही नोटीस 26, 27, 28 फेबुवारी 2026 व 1 मार्च 2026 या कालावधीत प्राप्त होणार याव्यतिरिक्त येणारा कोणत्याही प्रकारचा मेसेज संशयास्पद समजावा.

...असा जमा करा दंड

नागरिकांनी त्यांच्या वाहनावरील थकीत दंडाची रक्कम जमा करण्यासाठी पीटीपी ॲपचा वापर करावा. तसेच चौकात वाहतूक नियमनासाठी थांबलेल्या पोलिस अंमलदाराकडे देखील ही दंडाची रक्कम जमा करता येणार आहे. आपल्या जवळच्या वाहतूक विभागातसुद्धा ही दंडाची रक्कम भरण्याची सोय करून देण्यात आली आहे. वाहनधारकांना अधिकृत वेबसाइटसह अंमलदारांकडे दंडाची रक्कम भरावी. डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे दंड भरता येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT