School Bus Pudhari
पुणे

Pune School Bus Safety Rules: पुण्यात स्कूल बससाठी नवे सुरक्षा नियम; नियमभंग केल्यास परवाना निलंबित किंवा रद्द

सीसीटीव्ही, चालकांची चारित्र्य पडताळणी अनिवार्य; पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी महिला सहवर्ती बंधनकारक

पुढारी वृत्तसेवा

पुणे: विद्यार्थी वाहतूक हा संवेदनशील विषय असून, शाळा प्रशासन व बसचालकांनी नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश पुणे शहर पोलिस सहआयुक्त संजय दराडे यांनी दिले. पुणे शहर आयुक्तालयात आयोजित जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी सादरीकरण केले.

कोणते आहेत आदेश?

  • फिटनेस प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी वाहनात सीसीटीव्ही कार्यान्वित असणे बंधनकारक आहे. तसेच, १६ जुलै २०२६ च्या नवीन सुधारित नियमांनुसार अतिरिक्त सुरक्षा तरतुदींची अंमलबजावणी करावी.

  • चालक, मदतनीस व महिला सहवर्ती यांची पोलिस चारित्र्य पडताळणी, नेत्र आणि वैद्यकीय तपासणी अनिवार्य आहे. यासाठी: https:///pcs.mahaonline.gov.in/ वर अर्ज करावा. ७ दिवसांत कार्यवाही पूर्ण होईल.

  • ५ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक फेरीत महिला सहवर्ती अनिवार्य राहील. बस कंत्राटदारांनी विद्यार्थ्यांच्या चढण्या-उतरण्याच्या वेळांची नोंद ठेवावी. दिव्यांगांसाठी विशेष सुविधा व गरजेनुसार शिक्षक/पालकांसाठी प्रवासाची व्यवस्था करावी.

  • प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाद्वारे निश्चित केलेल्या दरांपेक्षा १० टक्क्यांहून अधिक किंवा कमी भाडे आकारता येणार नाही. शाळा किंवा पालकांसोबत मानक करारनामा करणे आवश्यक आहे.

  • शाळांनी: https:///schoolbussafetypune.org/ वर माहिती अद्ययावत करावी. अडचणींसाठी वरिष्ठ लिपिक दत्तात्रय गुंजकर (मो. नं.९४२३२६५९५५) यांच्याशी संपर्क साधावा. सर्व शाळा व वाहतूकदारांनी ३ महिन्यांत सर्व बाबींची पूर्तता करावी; अन्यथा बसचा परवाना निलंबित किंवा रद्द केला जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिस व आरटीओकडून कठोर कारवाई केली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT