Abandoned Vehicles Pudhari
पुणे

Pune Abandoned Vehicles: पुण्यात बेवारस वाहनांवर कारवाईचा वेग; 739 वाहनांचा लिलाव, नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन

PTP ॲपद्वारे माहिती देण्याचे वाहतूक पोलिसांचे आवाहन; रस्त्यावर अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई सुरू

पुढारी वृत्तसेवा

पुणे: रस्त्यावर बऱ्याच कालवधीपासून बेवारस स्थितीत उभ्या असलेल्या आणि वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वाहनांची माहिती पी.टी.पी. (पुणे सिटी ट्रॅफिक पोलिस) ॲपद्वारे वाहतूक विभागाला कळवावी, या वाहतूक पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून दै. ‌‘पुढारी‌’ने अशा वाहनांची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली आहे.

शहराच्या विविध भागांत धूळ खात पडून असलेल्या अशा वाहनांची छायाचित्रे, ते पडून असल्याचे ठिकाण याची माहिती दै. ‌‘पुढारी‌’मध्ये देण्यात येत असून, या वाहनांची माहिती पोलिसांच्या पीटीपी ॲपवरही देण्यात येत आहे.

आपल्यालाही आपल्या परिसरात पडून असलेल्या अशा वाहनांची माहिती आम्हाला मो. क्र. 8805027656 वर कळविता येईल. या माहितीसोबत वाहनाचा फोटो, ते पडून असलेल्या ठिकणचा संपूर्ण पत्ता, जवळची खूण इत्यादी माहिती कळविणे आवश्यक आहे.

आपण आपल्या परिसरातील पोलिस ठाण्यातही अशा वाहनांची माहिती देऊ शकता, अशी माहिती मिळाल्यानंतर वाहतूक पोलिसांच्या वतीने वाहनांची पडताळणी करून त्यांच्या मालकांशी संपर्क साधण्यात येतो. त्याचा शोध न लागल्यास वाहतूक पोलिसांमार्फत ते वाहन तेथून हटविण्यात येते.

739 बेवारस वाहनांच्या लिलाव

वाहतुकीला अडथळा करीत रस्त्याकडेला धूळ खात पडून असलेल्या 739 बेवारस वाहनांचा लिलाव करून तब्बल पन्नास लाख दहा हजार रुपये पोलिसांनी शासनाच्या तिजोरीत जमा केली आहे. शहराच्या अकरा पोलिस ठाण्यांत आणि वाहतूक शाखेत ही वाहने गेल्या अनेक वर्षांपासून पडून होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT