पुणे : पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहर पोलिस दलात मोठे फेरबदल केले असून, शहरातील 27 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्याचे आदेश दिले आहेत.
काही अधिकाऱ्यांचा पोलिस ठाण्यातील कार्यकाळ पूर्ण झाल्याने, तर काहींचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच त्यांच्या बदल्या केल्या आहेत. गुन्हे शाखेतील सहा पोलिस निरीक्षकांकडे पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदाची जबाबदारी सोपवली, तर पोलिस ठाण्याच्या प्रभारीपदाचे काम पाहणाऱ्यांची गुन्हे शाखेत वर्णी लागली आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ निरीक्षकाच्या कामकाजावर नेहमी लक्ष ठेवून असतात. वेळोवेळी ते त्यांच्या कामाचा आढावा घेत असतात. एवढेच नाही, तर त्यांच्याकडे आलेल्या तक्रारदारांच्या तक्रारीवरून देखील ते पोलिस निरीक्षकांच्या कामकाजाचे मूल्यमापन करतात. बदल्यांबाबत अमितेश कुमार कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. कर्तव्यात कसूर केली, तर प्रभारी अधिकाऱ्याची कोणत्याही प्रकारची बडदास्त न ठेवता ते त्यांची उचलबांगडी करतात. कधी वरिष्ठ अधिकाऱ्यांना ते गुन्हे निरीक्षक करतात, तर कधी गुन्हे निरीक्षकांना ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून कामाची संधी देतात. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात बदली प्रक्रिया हा अधिकाऱ्यांसाठी नेहमीच धास्तीचाच विषय राहिलेला आहे.
बदली केलेल्या पोलिस निरीक्षकांची नावे पुढीलप्रमाणे : जयंत राजूरकर (सहकारनगर पोलिस ठाणे ते वरिष्ठ पोलिस निरीक्षक समर्थ पोलिस ठाणे), राघवेंद्रसिंह क्षीरसागर (पोलिस निरीक्षक, पोलिस कल्याण शाखा ते उत्तमनगर पोलिस ठाणे), विनय पाटणकर (नियंत्रण कक्ष ते वरिष्ठ पोलिस निरीक्षक सिंहगड रस्ता पोलिस ठाणे), मारुती पाटील (वाहतूक शाखा ते वरिष्ठ पोलिस निरीक्षक येवलेवाडी पोलिस ठाणे), संतोष खेतमाळस (आर्थिक गुन्हे शाखा ते लष्कर पोलिस ठाणे), नंदकुमार गायकवाड (पर्वती पोलिस ठाणे ते वाघोली पोलिस ठाणे), मनीषा पाटील (मार्केट यार्ड-लोहगाव पोलिस ठाणे), विश्वजित जगताप (लोहगाव ठाण्यातून मार्केट यार्ड पोलिस ठाणे), राजेंद्र सहाणे (वाहतूक शाखेतून पर्वती पोलिस ठाणे), महेश बोळकोटगी (शिवाजीनगरमधून वारजे माळवाडी पोलिस ठाणे), उमेश गित्ते (समर्थ पोलिस ठाणे ते लक्ष्मीनगर पोलिस ठाणे), मोहन खंदारे (उत्तमनगर ठाण्यातून आर्थिक गुन्हे शाखा), दिलीप दाईंगडे (सिंहगड रस्ता पोलिस ठाणे ते गुन्हे शाखा), अमर काळंगे (येवलेवाडीतून शिवाजीनगर पोलिस ठाणे), युवराज हांडे (वाघोलीतून गुन्हे शाखा), विश्वजित काईंगडे (वारजे माळवाडीतून खंडणीविरोधी पथक), माया देवरे (गुन्हे शाखा ते वाहतूक शाखा), मनोजकुमार लोंढे (गुन्हे शाखा ते सहकारनगर पोलिस ठाणे).
नीलेश बडाख (वारजे माळवाडीतून मुंढवा पोलिस ठाणे), पल्लवी मेहेर (येरवडा येथून वाघोली पोलिस ठाणे), नितीन भोयर (सिंहगड रस्ता पोलिस ठाणे ते विशेष शाखा), जितेंद्र कदम (गुन्हे शाखेतून कल्याण शाखा), सुनीता नवले (मार्केट यार्ड पोलिस ठाणे ते येवलेवाडी), धनंजय पिंगळे (शिवाजीनगर ठाण्यातून वाहतूक शाखा), गिरीश दिघावकर (लष्कर पोलिस ठाण्यातून शिवाजीनगर), सीमा ढाकणे (वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंदनगर ते पोलिस निरीक्षक वाहतूक शाखा), नीलेश बडाख (पोलिस निरीक्षक गुन्हे मुंढवा ते वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंदननगर)
अजित जाधव (युनिट एक), अश्विनी जगताप (युनिट दोन), प्रशांत अन्नछत्रे (युनिट तीन), कांचन जाधव (युनिट चार), संदीपान पवार (युनिट पाच), सुदर्शन गायकवाड (युनिट सहा), संतोष सोनवणे (युनिट सात), वाहिद पठाण (अमली पदार्थविरोध पथक - एक), पंडित रेजितवाड (अमली पदार्थविरोधी पथक-दोन), राम राजमाने (खंडणीविरोधी पथक दोन), वर्षा देशमुख (दरोडा आणि वाहन चोरीविरोधी पथक-एक), दत्ताराम बागवे (दरोडा आणि वाहन चोरीविरोधी पथक-दोन), चंद्रकांत बेदरे (प्रशासन), छगन कापसे (अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, ए. एच. टी. यू.), आशालता खापरे (भरोसा सेल).