Pune Bar Association Election: पुणे बार असोसिएशनची निवडणूक 4 फेब्रुवारीला; तारीख बदलाचा निर्णय

जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बदल; मतदान व मतमोजणी एकाच दिवशी
Pune Bar Association Election
Pune Bar Association ElectionPudhari
Published on
Updated on

पुणे : पुणे बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीची तारीख बदलली असून, पूर्वी जाहीर केलेल्या 6 फेबुवारीऐवजी आता 4 फेबुवारी रोजी मतदान होणार आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच यादरम्यान मतदानप्रक्रिया पार पडणार असून त्याच दिवशी रात्री मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. प्रताप परदेशी आणि उपअधिकारी ॲड. धैर्यशील पाटील यांनी दिली.

Pune Bar Association Election
Swargate Hukka Parlour Raid: स्वारगेटमध्ये बंद शटरआड हुक्का पार्लर; पोलिसांचा छापा, अग्निशमन दलाच्या मदतीने प्रवेश

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये झालेल्या बदलामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेतील मृत्यूमुळे तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असून, त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

Pune Bar Association Election
Pune Crime Branch Restructuring: गुन्हे शाखेची पुनर्रचना; पुण्यात सात परिमंडळांसाठी सात स्वतंत्र युनिट कार्यरत

आता 7 फेबुवारी रोजी मतदान व 9 फेबुवारीला मतमोजणी होणार आहे. पुणे बार असोसिएशनमधील अनेक वकील ग््राामीण भागातील असल्याने त्यांना दोन्ही निवडणुकांमध्ये सहभाग घेता यावा आणि मतदानापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या परवानगीने निवडणुकीच्या तारखेत बदल करण्यात आल्याचे ॲड. परदेशी यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news