पुणे : पुढारी वृत्तसेवा : दंगलीबाबत माहिती लपविल्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करा, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी केली होती. त्या वक्तव्यावर संतप्त होत, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुवारी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले
आहे.
त्यापार्श्वभूमीवर गुरुवारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गरवारे कॉलेज परिसरात जोरदार आंदोलन केले. या वेळी कार्यकर्त्यांनी राणेंविरोधात 'चिंधी चोर, कोंबडी चोर' अशा शब्दांमध्ये घोषणाबाजी केली. यासह नारायण राणे यांच्या तोंडाला काळे फासून
गाडीची तोडफोड करण्याचा इशारा दिला.
हेही वाचा