पुणे : राज्यात सहायक प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्यासाठी परवानगी द्यावी, तसेच तासिका तत्त्वावर काम करणार्या अध्यापकांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आदेशानुसार प्रतितासिका दीड हजार रुपये मानधन द्यावे, या मागण्यांसाठी
महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेच्या वतीने 16 आणि 17 नोव्हेंबर दरम्यान नवीन उच्च शिक्षण संचालनालयासमोर दोनदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष डॉ. संदीप पाथ—ीकर यांनी दिली आहे.
राज्यात एक ऑक्टोबर 2017 च्या आकृतिबंधाला अंतिम मंजुरी देऊन 100 टक्के सहायक प्राध्यापक पदभरतीला परवानगी द्यावी. तासिका तत्त्वावर काम करणार्या अध्यापकांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आदेशानुसार प्रतितासिका 1500 रुपये मानधन वर्षातील 11 महिने देण्यात यावे, तासिका तत्त्वावरील अनुभव हा कायम नियुक्तीनंतर ग्राह्य धरण्यात यावा, अशा मागण्या आंदोलनाद्वारे करण्यात येणार आहेत.
हेही वाचा