पुणे

Pune News : बाल वैज्ञानिकांनी अनुभवली महाराष्ट्राची संस्कृती

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मेट्रोमधून केलेली पुण्याची सफर…. विज्ञान उद्यानातील विविध खेळणी व उपकरणे यांच्या माध्यमातून अनुभवलेले विज्ञानाचे सिद्धांत…. अवकाश दर्शन… शिवसृष्टीमध्ये लेझर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनुभवलेले छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांचे दर्शन… अशा अनेक गोष्टी रविवारी (दि.31) अनुभवत बाल वैज्ञानिकांनी महाराष्ट्राची संस्कृती व पुण्याचे नयनरम्य दर्शन समजून घेतले आणि अनोख्या पद्धतीने सरत्या वर्षाला निरोप दिला. निमित्त होते, राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनानंतर आयोजित करण्यात आलेल्या शैक्षणिक सहलीचे.

विद्या प्राधिकरण, नवी दिल्ली, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित 50 वी राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी उत्साहात संपन्न झाली. त्यानंतर राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनीतील बाल वैज्ञानिक व देशभरातील मार्गदर्शक शिक्षक व अधिकारी यांच्यासाठी पुणे शहरातील ऐतिहासिक व आधुनिक स्थळांचे दर्शन घडाविण्यात आले. त्यावेळी बाल वैज्ञानिकांनी हा अनोखा अनुभव घेतला.

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद सचिव प्रत्यूष मंडल, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, विद्या प्राधिकरणाचे संचालक अमोल येडगे, सहसंचालक रमाकांत काठमोरे, उपसंचालक डॉ. कमलादेवी आवटे, डॉ. नेहा बेलसरे , डॉ. माधुरी सावरकर, डॉ. शोभा खंदारे, विज्ञान विभागाचे प्रमुख तेजस्विनी आळवेकर, रत्नप्रभा भालेराव आदी मान्यवर यानी शैक्षणिक सहलीमध्ये सहभाग घेतला.
नवी दिल्ली येथील राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतील विज्ञान व गणित विषयाच्या विभागप्रमुख सुनीता फरक्या, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद सचिव प्रत्यूष मंडल तसेच अमोल येडगे आदींनी या वेळी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. तत्पूर्वी शनिवारी सायंकाळी वैज्ञानिक प्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT