prostitution racket crime case Pudhari
पुणे

Pune Prostitution Racket: नवले ब्रिज परिसरातील वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा; ९ महिलांची सुटका, दोघे अटकेत

अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाची कारवाई; लॉजमधून सुरू असलेल्या गैरप्रकाराचा पर्दाफाश

पुढारी वृत्तसेवा

पुणे: नवले ब्रिज परिसरात मागील अनेक महिन्यांपासून राजरोसपणे सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर अखेर अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाने कारवाई केली आहे. या वेळी ९ मुलींची सुटका करीत दोघांना अटक केली आहे.

दरम्यान, संबंधित परिसरात मोठ्या प्रमाणावर महिला, मुली, तृतीयपंथी रस्त्यावर उभा राहून अश्लील वर्तन करणे, नागरिकांना त्रास देण्याच्या अनेक तक्रारी आहेत. त्यासंदर्भात स्थानिकांनी वारंवार स्थानिक पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र, त्यांची दखल घेण्यात आली नसल्याचे अनेकांनी सांगितले.

राकेश राजू पाटोळे (वय २७ रा. बेनकर चाळ, गणेशनगर, धायरी), मंगेश व्यंकट बनसोडे ( रा, गॅलेक्सी लॉज आंबेगाव, कात्रज रोड आंबेगाव पुणे मुळ पत्ता मु. पो. खेड, ता. लोहारा जि. धाराशिव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

ही कारवाई २० जुलैला साई किरण लॉज आंबेगाव बुद्रुक, कात्रज आंबेगाव रोड, बर्गर किंग नवले पुलाजवळ आंबेगाव या ठिकाणी करण्यात आली. महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. त्या पार्श्वभूमीवर पोलिस निरीक्षक आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने बनावट ग्राहकाच्या मदतीने खातरजमा केली.

त्यानंतर साई किरण व गॅलेक्सी लॉजमध्ये छापा टाकून लॉजमध्ये वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या ९ महिलांची सुटका केली. याप्रकरणी रिक्षाचालक राकेश पाटोळे, लॉज मॅनेजर मंगेश बनसोडे यांना अटक केली. ही कामगिरी गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आशालता खापरे, सहायक पोलिस निरीक्षक विक्रम मिसाळ यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT