Pune Municipal Mayor Election Pudhari
पुणे

Pune Municipal Mayor Election: महापौर निवडणुकीत काँग्रेसची माघार, भाजपला बिनविरोध वाटचाल

पहिल्याच सभेत भाजपला साथ; महापालिकेत कणखर विरोधी पक्ष कोण?

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महापालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीत काँग््रेासने दोन्ही अर्ज माघारी घेत भाजपला साथ दिली. पहिल्याच खास सभेत भाजपसाठी काँग््रेास सरेंडर झाल्याचे चित्र यानिमित्ताने पाहायला मिळाले. त्यामुळे आगामी काळात महापालिकेत कणखर विरोधी पक्षाची भूमिका कोण निभावणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

तब्बल चार वर्षांनंतर महापालिकेत महापौर व उपमहापौराची निवड झाली. या निवडणुकीसाठी विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग््रेाससह काँग््रेासच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. राज्यात महायुतीत भाजपसमवेत राष्ट्रवादी काँग््रेास असल्याने महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी त्यांच्या उमेदवारांचे अर्ज माघारी घेतील, असे सांगण्यात येत होते.

त्यानुसार प्रत्यक्ष निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादीने दोन्ही अर्ज माघारी घेतले. मात्र, महापौर व उपमहापौर या दोन्ही पदांची निवडणूक लढविण्यावर ठाम असलेल्या काँग््रेासने अखेरच्या क्षणी कोलांट उंडी घेत दोन्ही पदांसाठीचे अर्ज माघारी घेत ही निवडणूक बिनविरोध करण्यास भाजपला साथ दिली. एकाच वेळी राष्ट्रवादी काँग््रेास व काँग््रेास दोन्ही पक्षांनी माघार घेतल्याने सभागृहात विरोधी पक्षाची धारच कमी झाली. विशेष म्हणजे, महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग््रेासने काँग््रेास, शिवसेना (उबाठा), मनसे या सर्वांना एकत्रित निवडणूक लढविण्यासाठी मोट बांधली होती.

मात्र, राज्यात राष्ट्रवादी भाजपसमेवत सत्तेत असल्याने काँग््रेासने राष्ट्रवादीसह एकत्र निवडणूक लढविण्यास नकार दिला होता. त्याचा फटका सर्वच विरोधी पक्षांना निवडणुकीत बसला तर भाजपला थेट फायदा झाला होता. आता निवडणुकीनंतरच पहिल्याच सभेत मात्र काँग््रेासने थेट भाजपला साथ देत सरेंडर होण्याच्या घेतलेल्या भूमिकेने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

काँग््रेासच्या वरिष्ठ नेत्यांचा फोन अन्‌‍ सूत्रे फिरली

महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक लढविण्याची तयारी काँग््रेासने घेतली होती. मात्र, सोमवारी सकाळी काँग््रेासचे पुण्याचे निरीक्षक बंटी ऊर्फ सतेज पाटील यांचा फोन आला. त्यांनी दोन्ही उमेदवारांचे अर्ज माघारी घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे सूत्रे फिरली अन्‌‍ दोन्ही पदांची निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT