पुणे: महापालिका निवडणूक जाहीर झाल्यावर भाजपने महाविकास आघाडीसह मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग््रेासला धक्का देण्याचे काम सुरू केले आहे. या सर्व पक्षांतील काही दिग्गज माजी नगरसेवकांसह जवळपास 20 हून अधिक जण आज शनिवारी (दि.20 डिसेंबर) मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत इच्छुकांची सर्वाधिक संख्या भाजपमध्ये आहे. दोन हजारांहून अधिक इच्छुकांनी उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या आहेत. असे असताना भाजपने यावेळेस 125 जागा जिंकण्यासाठी महापालिकेत 2017 मध्ये राष्ट्रवादी काँग््रेाससह काँग््रेासने जिंकलेल्या जागांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार वडगाव शेरी, खडकवासला, हडपसर या मतदारसंघांतील राष्ट्रवादीचे काही माजी नगरसेवक आणि मातब्बरांना गळाला लावण्यात यश मिळविले आहे.
या सर्वांचा प्रवेश शनिवारी मुंबईत भाजप कार्यालयात होणार आहे. दरम्यान, आयत्या उमेदवारांमुळे पक्षातील निष्ठावंतांवर अन्याय होणार असल्याने या पक्षप्रवेशांना विरोध झाला होता. त्यामुळे हे पक्षप्रवेश रखडले होते. अखेर आता आचारसंहिता लागू झाल्याने या पक्षप्रवेशांना मुहूर्त मिळाला आहे. या पक्षप्रवेशामुळे भाजपची बाजू आणखी भक्कम होणार असून, विरोधी पक्षांना मात्र धक्का बसणार आहे.
आमदारपुत्रांसह दिग्गजांचा समावेश
भाजपमध्ये शनिवारी प्रवेश करणाऱ्यांमध्ये वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांचे सुपुत्र सुरेंद्र पठारे. वारजे परिसरातील माजी नगरसेविका सायली वांजळे यांच्यासह पठारे कुटुंबातील अन्य इच्छुकांचा समावेश आहे.
याशिवाय राष्ट्रवादी काँग््रेास उपाध्यक्ष नारायण गलांडे, धनकवडी भागातील माजी नगरसेवक बाळा धनकवडे, पाषाण परिसरातील माजी नगरसेविका रोहिणी चिमटे यांच्यासह खडकवासला मतदारसंघातील दोन्ही राष्ट्रवादी काँग््रेासमधील दोन माजी नगरसेवकांचा समावेश आहे.