Pune Municipal Corporation Pudhari
पुणे

Pune Municipal Corporation Budget 2026-27: पुणे महापालिकेचे 2026-27 अंदाजपत्रक अंतिम टप्प्यात; १५ हजार कोटींचा टप्पा पार होणार?

चालू वर्षीचे 12,618 कोटींचे बजेट; नव्या स्थायी समिती अध्यक्षांकडे लवकरच सादरीकरण होणार, वाढीव निधीबाबत उत्सुकता

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महापालिकेचे पुढील आर्थिक वर्षाचे (2026-27) अंदाजपत्रक तयार करण्याचे काम प्रशासनाकडून अंतिम टप्प्यात आले आहे. नवनिर्वाचित स्थायी समिती अध्यक्षांकडे हे अंदाजपत्रक सादर केले जाणार आहे. यावर्षी हे अंदाजपत्रक किती हजार कोटींचा टप्पा पार करणार, याबाबत उत्सुकता आहे.

महापालिकेचे अंदाजपत्रक दरवर्षी साधारणपणे जानेवारी महिन्यात प्रशासनाकडून मांडले जाते. त्यानंतर स्थायी समितीकडून त्यात नव्याने योजनांचा समावेश करून मार्च महिन्यात मुख्य सभेच्या मंजुरीने त्यावर शिक्कामोर्तब होते.

मात्र, गेल्या वर्षापासून प्रशासकराज असताना पालिका आयुक्तांकडून जानेवारीऐवजी थेट मार्च महिन्यात अंदाजपत्रक सादर करण्याची प्रथा पडली आहे. यावर्षी मात्र निवडणुका होऊन पुन्हा सभागृह अस्तित्वात आले आहे. त्यामुळे प्रशासनाचे अंदाजपत्रक कधी सादर होणार? याकडे लक्ष लागले आहे. मात्र, यावर्षी पुन्हा हे अंदाजपत्रक सादर होण्यास विलंब झाला आहे.

मुख्य लेखा विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अंदाजपत्रक तयार करण्याचे अंतिम टप्प्यात आले आहे. पुढील आठवड्यात हे अंदाजपत्रक छपाईला जाईल. त्यामुळे आता पुढील आठवड्यात स्थायी समितीच्या अध्यक्षांची निवडणूक होणार असून.

नवनिर्वाचित स्थायी समिती अध्यक्षांकडे अंदाजपत्रक सादर होणार आहे. दरम्यान, चालू वर्षाचे अंदाजपत्रक 12 हजार 618 कोटींचे होते. त्यामुळे आता पुढील आर्थिक वर्षाचे बजेट 15 हजार कोटींचा टप्पा गाठणार का? याबाबत उत्सुकता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT