Budget Pudhari
पुणे

Pune Municipal Budget 2026: पुणे महापालिका अर्थसंकल्पावर 11 तासांचा घमासान; आरोप-प्रत्यारोपात अखेर मंजुरी

₹15,669 कोटींच्या बजेटवर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने; विकास की फुगवटा?

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महापालिकेच्या 2026-27 च्या 15 हजार 669 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पांत सर्वांगीण विकासाचा रोडमॅप असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला, तर निधीवाटपात दुजाभाव आणि पारदर्शकतेच्या अभावाचा आरोप विरोधकांनी केला. तब्बल 11 तासांहून अधिक चाललेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली.

काँग््रेासचे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी अंदाजपत्रकावर उपरोधिक टीका करत ते वास्तवदर्शी नसून, अवास्तव असल्याचे म्हटले. शासकीय अनुदान आणि मिळकत कराच्या आकडेवारीत वाढ दाखवून बजेट फुगवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे गटनेते नितीन गावडे म्हणाले, महिलांसाठीच्या योजना सकारात्मक आहेत. मात्र, अनेक स्वच्छतागृहांची अवस्था नीट नाही. ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास ही योजना चांगली आहे. मात्र, ठेकेदारांचे चालक-वाहक त्यांच्याशी चांगले वागत नाहीत.

राष्ट्रवादी कॉंग््रेास (श. प.) पक्षाचे गटनेते काका चव्हाण म्हणाले, समाविष्ट गावांतील नागरिकांचा वाहतूक कोंडीत बराच वेळ जातोय. प्यायला शुद्ध पाणी नाही, कचऱ्याचा प्रश्नही गंभीर आहे. कॉंग््रेासचे गटनेते रामचंद्र कदम म्हणाले, या आभासी अर्थसंकल्पाचा कोणताही फायदा होणार नाही. यातील अनेक योजना फसव्या आहेत. अनेक प्रकल्प तयार करताना महापालिकेचे मोठे नुकसान झाले आहे.

राष्ट्रवादी कॉंग््रेासचे गटनेते नीलेश निकम म्हणाले, मोठ्या घाईत हे अर्थसंकल्प मांडण्यात आले आहे. हा अर्थसंकल्प घाईने का मंजूर केला जातोय, याची शंका वाटते. अनेक नगरसेवक हे पाहिल्यांदा निवडून आले आहेत. त्यांना देखील निधी कमी देण्यात आला आहे.

उपमहापौर परशुराम वाडेकर म्हणाले, सर्वसामान्य माणसाला समोर ठेवून हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. भिडेवाड्यासाठी मोठ्या तरतुदी केल्या आहेत. शहरातील सर्व स्वच्छतागृहे चांगली करण्यात यावीत.

सभागृह नेते गणेश बिडकर यांनी अंदाजपत्रक हे विकसित पुण्याच्या दृष्टीने भक्कम पाऊल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील ग््राोथ हब म्हणून पुण्याला सक्षम करणारे आहे. शहरापुढे असणाऱ्या आव्हानांचा विचार करण्यात आला आहे. प्रत्येक छोट्या घटकाचा विचार यात करण्यात आला आहे.

तसेच करदात्यावर कुठलाही बोजा न देता हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. अध्यक्ष भिमाले यांनी विरोधकांच्या शंका आणि प्रश्नांना उत्तरे देत उत्पन्न वाढविण्यासाठी करण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे, अशी भूमिका स्पष्ट केली.

महापौरांनी केले कौतुक

महापौर मंजूषा नागपुरे यांनी या अर्थसंकल्पाचे कौतुक केले. हा अर्थसंकल्प सर्वव्यापी आहे, असे सांगत त्या म्हणाल्या,‌‘विकासाच्या मुद्द्‌‍यावरून आपण सर्व हेवेदावे विसरून एकत्र आलो आहोत. विरोधक आणि सत्ताधारी यांच्या एकत्र विचारातून हा अर्थसंकल्प तयार झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT