Assault Pudhari
पुणे

Pune Assault Case: पुण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; चार आरोपी अटकेत

भारती विद्यापीठ परिसरातील धक्कादायक प्रकार; एक आरोपी फरार, पोलिस तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पंधरा वर्षांच्या अल्पवयीन गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला, तर दोघांनी तिच्याशी अश्लील चाळे केल्याचा प्रकार समोर आला आहे. मागील तीन ते साडेतीन महिन्यांत हा प्रकार घडला असून, तिघांनी वेगवेगळ्या वेळी तसेच वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

आशुतोष विजयकुमार पाटील (वय 25), नागेश सूर्यवंशी (वय 21), गौरव माने (वय 20) यांना बलात्कार तसेच प्रीतम जगताप याला विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक केली आहे. तर, एक आरोपी पसार झाला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी तीन तरुणांवर बलात्कार तसेच दोन तरुणांवर विनयभंगाचा गुन्हा नोंदविला आहे.

आरोपी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहण्यात आहे, तर ही पीडित मुलगी अल्पवयीन असण्याबरोबर गतिमंद आहे. मागील तीन ते साडेतीन महिन्यांपासून आशुतोष, नागेश तसेच गौरव या तिघांनी तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी आणि एकट्या-एकट्यांनी तिला गाठून अत्याचार केला.

तर, प्रीतम या तरुणाने तिच्या अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला. तसेच पाचव्या आरोपीने तिच्याशी व्हिडीओ कॉल करून तिचा विनयभंग केला असल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान, या प्रकरणात मंगळवारी गुन्हा नोंदविण्यात आला असून, त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात चौघांना अटक केली आहे.

तीन आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या वेळी बलात्कार केला आहे. सामूहिक अत्याचार झालेला नसला तरी हे आरोपी एकमेकांच्या ओळखीतील असल्याचे समजते. तर, तिघांनी या तरुणीला पकडून तिच्याशी अश्लील चाळे देखील केले. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल खिलारे यांनी आरोपींना अटक केल्याची माहिती दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT