Veerdhaval Jagdale: पुणे ZP अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून अजितदादांच्या निष्ठावंतांना संधी, कोण आहेत वीरधवल जगदाळे?

veerdhaval jagdale daund politics: दौंडचे वीरधवल जगदाळे यांचा राजकीय वारसा, सहकार क्षेत्रातील भूमिका आणि शेतकऱ्यांसाठीचे काम यांचा आढावा
Veerdhaval Jagdale
Veerdhaval JagdalePudhari
Published on
Updated on

Pune Zp Election 2026 Who is veerdhaval jagdale

दौंड: वीरधवल उर्फ (बाबा) जगदाळे हे दौंड तालुक्यातील महत्त्वाच्या राजकीय घराण्यातून येतात. वीरधवल जगदाळे यांचे वडील कै, बाळासाहेब जगदाळे, व मातोश्री उषादेवी जगदाळे हे दोघेही प्रदीर्घ काळ दौंडचे विधानसभेचे सदस्य होते त्यामुळे जगदाळे कुटुंबीयांना राजकीय वारसा आहे.

Veerdhaval Jagdale
Sambhaji Maharaj Punyatithi: वढू-तुळापूर येथे संभाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त भक्तांची गर्दी

वीरधवल जगदाळे स्वत: सलग तिसऱ्यांदा पुणे जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले आहेत. नुकत्याच झालेल्या फेब्रुवारी २०२६ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी आपला विजय कायम राखला. सध्या त्यांची पुतणी दुर्गादेवी या दौंडच्या नगराध्यक्ष तर बंधू इंद्रजीत हे नगरसेवक आहेत.

Veerdhaval Jagdale
Pune PMPML Director Selection: पीएमपी व स्मार्ट सिटी संचालक निवडीकडे लक्ष; आज महापालिकेची सभा

जगदाळे यांच्या कार्याचा मुख्य विस्तार पुणे जिल्हा परिषद, दौंड नगरपालिका तसेच सहकार आणि राजकारणात दिसून येतो. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ते निष्ठावंत मानले जातात. दौंडमधील पक्षाची बांधणी आणि स्थानिक निवडणुकांमध्ये त्यांची भूमिका निर्णायक असते. दौंड नगरपरिषद निवडणुकीत (२०२५) राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारात त्यांचा मोठा सहभाग होता. त्यांना स्थानिक राजकारणात अचूक नियोजनासाठी ओळखले जाते.

Veerdhaval Jagdale
Pune Garbage Management Issue: पुण्यात कचरा व्यवस्थापनावर प्रश्न; सिंहगड विकास आराखड्याला मंजुरी

सिंचन आणि शेती या त्यांचा आवडता विषय आहे. यासह सहकार क्षेत्रात त्यांची विशेष रुची आहे. दौंड हा शेतीप्रधान तालुका असल्याने, नीरा-कऱ्हा उपसा सिंचन प्रकल्पासारख्या पाणी योजनांच्या पाठपुराव्यात आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ते सक्रिय असतात. यासह सहकारातील रुची आणि मूळ पिंड यामुळे ते दौंड शुगर साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत.

Veerdhaval Jagdale
Maharashtra Kesari Referee Controversy: महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेत पंच निवडीवरून वाद; बंदी उठविलेल्यांचा समावेश

त्या माध्यमातून त्यांनी दौंड तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांना प्रगतीपथावर नेले आहे. यासह दौंड आणि परिसरातील तरुणांचे संघटन करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांच्या याच राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील संघर्षाची दखल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतल्याचे दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news