Crane Accident Pudhari
पुणे

Pune Crane Accident: क्रेनचा पट्टा तुटल्याने अपघात; सळई अंगावर पडून महिलेचा मृत्यू

सकाळी अकराच्या सुमारास वैशाली भोसले आणि सहकारी कंपनीच्या आवारातून पिण्याचे पाणी आणण्यासाठी निघाल्या होत्या.

पुढारी वृत्तसेवा

पुणे : हडपसर येथील रामटेकडी ओैद्योगिक वसाहतीच्या आवारात लोखंडी जिन्याचे काम करताना क्रेनचा पट्टा तुटल्याने सळई डोक्यात पडून कामगार महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातास जबाबदार ठरल्या प्रकरणी वानवडी पोलिसांनी क्रेन चालकासह ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला.

वैशाली मारुती भोसले (वय ४७, रा. गोसावी वस्ती, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत भोसले यांचा मुलगा चेतन मारुती भोसले (वय २१) याने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथील रामटेकडी ओैद्योगिक वसाहतीत एका खासगी कंपनीत वैशाली भोसले काम करत होत्या. कंपनीच्या आवारात मागील बाजूस लोखंडी जिना तयार करण्याचे काम १८ फेब्रुवारी रोजी सकाळी अकराच्या सुमारास सुरू होते.

सकाळी अकराच्या सुमारास वैशाली भोसले आणि सहकारी कंपनीच्या आवारातून पिण्याचे पाणी आणण्यासाठी निघाल्या होत्या. क्रेन चालक लोखंडी जिना तयार करण्यासाठी सळई उचलत होता. त्या वेळी अचानक क्रेनचा पट्टा तुटला. पट्टा तुटल्यानंतर क्रेनने उचलेली सळई वैशाली यांच्या डोक्यात पडली. दुर्घटनेत वैशाली गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. क्रेन चालक, ठेकेदार यांनी पुरेशा सुरक्षाविषयक उपाययोजना न केल्याने दुर्घटना घडल्याचे चौकशीत उघड झाले. त्यानंतर क्रेन चालक, ठेकेदार, तसेच संबधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT