Sangli : क्रेनच्या धडकेत वृध्दाचा मृत्यू

सावळी (ता. मिरज) येथील घटना
Sangli Accident News
क्रेनच्या धडकेत वृध्दाचा मृत्यू
Published on
Updated on

कुपवाड : सावळी (ता. मिरज) येथील गाव तलावाच्या समोरील रस्त्यावर चालत जाणार्‍या संतू भीमा भोरे (वय 70, रा. कानडवाडी, ता. मिरज) यांना पाठीमागून येणार्‍या क्रेन चालकाने धडक दिली. अंगावरून चाक गेल्याने ते गंभीर जखमी झाले. मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची नोंद कुपवाड पोलिस ठाण्यात झाली आहे. पोलिसांनी क्रेन चालक संतोष गोरख बाबर (वय 25, सध्या रा. दत्तनगर, बामणोली, मूळ गाव सांगोला) याला अटक केली आहे.फिर्यादी प्रवीण भोरे यांचे वडील संतू भोरे हे रविवारी कुपवाड येथे त्यांच्या मित्राला भेटायला गेले होते. ते कुपवाड एमआयडीसीतून सावळीमार्गे कानडवाडीला चालत निघाले होते. सावळीतील गावतलावाच्या समोरील रस्त्यावर पाठीमागून येणार्‍या क्रेनने (क्र. एमएच 10 सीएन 879) त्यांना धडक दिली. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news