Dombivli Accident : क्रेनचा हुक निसटला.. फटका बसून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू, शिरढोणमध्ये धक्कादायक दुर्घटना

Dombivli Accident : क्रेनचा हुक निसटला.. फटका बसून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू,  शिरढोणमध्ये धक्कादायक दुर्घटना
Published on
Updated on

डोंबिवली : डोंबिवलीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शिरढोण येथे म्हाडाच्या गृहप्रकल्पावर काम करताना एका चाळीस वर्षीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. क्रेनची उंची वाढवताना अतिउच्च ताणाचा 'हुक' निसटून कपाळावर आदळल्याने ही भीषण दुर्घटना घडली.

दुर्घटना कशी घडली?

शिरढोण गावच्या हद्दीत म्हाडाचा समूह गृहप्रकल्प वेगाने सुरू आहे. सोमवारी संध्याकाळी ४ च्या सुमारास १६/ब या निर्माणाधीन इमारतीला लावलेल्या क्रेन मास्टची उंची वाढवण्याचे काम सुरू होते. मूळचे उत्तर प्रदेशातील असलेले विजयनाथ रामबहादूर कुशवाह (वय ४०) आणि क्रेन ऑपरेटर अरविंद गौतम हे तांत्रिक काम करत होते.

क्रेनचा पट्टा ताणून तो हुकमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत असतानाच, अति ताणामुळे तो विजयनाथ यांच्या हातातून सटकला. हा लोखंडी हुक इतक्या प्रचंड वेगाने विजयनाथ यांच्या कपाळावर आदळला की ते जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात आणि त्यानंतर केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र मंगळवारी (दि. ३) उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक के. आर. पाटील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news