BJP NCP Pudhari
पुणे

Pune Guardian Minister: अजित पवारांच्या निधनानंतर पुण्याचे पालकमंत्रिपद कोणाकडे? भाजप-राष्ट्रवादीत नव्या चर्चांना उधाण

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार? पालकमंत्रिपदावर फडणवीसांचा निर्णय ठरणार निर्णायक

पुढारी वृत्तसेवा

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राजकीय दृष्ट्या अनेक प्रश्न निर्माण झाले असतानाच आता आगामी काळात पुण्याचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादी काँग््रेासकडे कायम राहणार की भाजपकडे जाणार, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. पालकमंत्रिपद भाजपकडे असावे, अशी इच्छा भाजपच्या पुण्यातील नेत्यांची होती. त्यामुळे आता भाजप याबाबत नेमकी काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राज्यात महायुतीत सहभागी झाल्यानंतर पुण्याचे पालकमंत्रिपद चंद्रकांत पाटील यांच्याकडे देण्यात आले होते. किंबहुना तशा अटीवरच अजित पवार त्या वेळेस महायुतीत सहभागी झाले होते. मात्र, भाजपचे सर्वाधिक नऊ आणि राष्ट्रवादी काँग््रेासचे आठ आमदार असतानाही पुण्यासारख्या महत्त्वाच्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादीकडे गेल्याचे शल्य भाजपच्या स्थानिक नेत्यांना होते. अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे पुण्याचे पालकमंत्रिपद पुन्हा भाजप स्वत:कडे घेणार का, यासंबंधीच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

आता खासदार सुनेत्रा पवार ह्या उपमुख्यमंत्री होणार असून, आजच त्यांचा शपथविधी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे साहजिकच बारामती विधानसभेच्या रिक्त झालेल्या जागेवर सुनेत्रा पवार याच पोटनिवडणुकीतील उमेदवार असतील, हे स्पष्ट आहे. अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री पदाबरोबरच त्या पुण्याचे पालकमंत्रिपदाची धुरा सांभाळणार का, असा प्रश्न आहे. त्यामुळे भाजपकडून पालकमंत्रिपदाची मागणी केली जाऊ शकते.

तसे झाल्यास उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पालकमंत्रिपदाची धुरा जाऊ शकते. मात्र, पालकमंत्रिपद भाजपकडे घ्यायचे की पुन्हा राष्ट्रवादीला द्यायचे, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका निर्णायक असेल, असे सांगण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT