Sugar Price Hike: फेब्रुवारीसाठी साखरेचा कोटा कमी; साखर दरात प्रतिक्विंटल 100 रुपयांची उसळी

कोटा मर्यादित, गाळप हंगाम अंतिम टप्प्यात; घाऊक बाजारात साखर 4 हजार रुपयांवर
Sugar Price Hike
Sugar Price HikePudhari
Published on
Updated on

पुणे : केंद्र सरकारने फेब्रुवारी महिन्यासाठी 22 लाख 50 हजार मेट्रिक टन इतका साखरेचा कोटा खुला केला आहे. मागणीच्या तुलनेत कोटा कमी असल्यामुळे कारखान्यांवरील साखरेच्या निविदा क्विंटलला शंभर रुपयांनी वधारल्या असून, निविदांमधील दर 3,650 रुपये झाला आहे. तर, घाऊक बाजारातही एस्‌‍ 30 ग््रेाड साखरेचे दर क्विंटलला 50 ते 100 रुपयांनी वाढून प्रतिक्विंटलला चार हजार रुपयांवर पोहचले आहेत. तुलनेने बाजारात सध्या मागणी कमी असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

Sugar Price Hike
Adachiwadi Village Development: आडाचीवाडीचा विकास मॉडेल अभ्यासण्यासाठी ‘यशदा’अंतर्गत 40 गटविकास अधिकाऱ्यांचा दौरा

फेबुवारी महिन्यातील 28 दिवसांसाठी साखरेचा हा कोटा तसा समतोल म्हणावा लागेल. मात्र, राज्यातील यंदाचा 2025-26 चा ऊस गाळप हंगाम आता अखेरच्या टप्प्याकडे झुकला आहे.

15 फेबुवारीपर्यंत बऱ्याचशा जिल्ह्यातील ऊस गाळप संपल्याने कारखाने बंद होण्यास सुरुवात होईल. मात्र, मागील दोन महिने राज्यातील बाजारपेठांमध्ये वस्तू आणि सेवाकर अर्थातच जीएसटी कर बुडवून रिकव्हरी चोरलेल्या साखरेची आवक बाजारात येत असल्याची जोरदार चर्चा होती. शिवाय, कोट्यातील साखर आणि कर बुडवून आलेल्या साखरेच्या जादा आवकेमुळे दरही मंदीतच झुकले होते. तर, दुसरीकडे कर बुडवून आलेल्या साखरेचे असे मालट्रक्स तपासून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी त्याचवेळी केली होती. हंगामात अशी कोणतीच कारवाई झाल्याचे समोर आले नाही.

Sugar Price Hike
Sodium Ion Battery: पुण्यात तयार झाली देशातील पहिली सोडियम बॅटरी; लिथियमला स्वदेशी पर्याय

आता ऊस गाळप हंगामअखेरीस सुरुवात झाल्यामुळे कारखान्यांकडून अशा जीएसटी बुडवून होणाऱ्या साखर विक्रीस हात आखडता घेतला जाणे अपेक्षित मानले जात असल्याचीही जोरदार चर्चा सध्या बाजारात सुरू आहे.

साहजिकच, बाजारात कारखान्यांना दिलेल्या कोट्यानुसारच टेंडर होऊन साखरेची बाजारात आवक अपेक्षित मानली जाते. त्यामुळे बाजारात मागील महिन्याच्या तुलनेत यापुढे आवक कमी होण्याच्या शक्यतेने साखरेच्या निविदा उंचावण्यास मदत झाल्याची माहिती बाजारपेठेतील सूत्रांनी दिली.

Sugar Price Hike
Lonavala Firing Case: गोळीबार प्रकरणाचा धक्कादायक खुलासा; राहुल तारूने खोट्या कागदपत्रांवर मिळवला शस्त्र परवाना

साखर कारखान्यांवर कोटा जाहीर होण्यापूर्वी साखरेच्या प्रतिक्विंटलला 3550 रुपयांपर्यंत जाणाऱ्या निविदा उंचावून आता 3650 रुपयांवर पोहचल्याचे सांगण्यात आले.

दिनांक 1 फेबुवारीपासून साखरेच्या नवीन निविदा सुरू होताच यामध्ये आणखी वाढ होण्याचा जाणकारांचा अंदाज आहे. दरम्यान, घाऊक बाजारात एस्‌‍ 30 ग््रेाड साखरेचा प्रतिक्विंटलचा दर 3,900 ते 3,950 रुपये होता. तो वाढून आता 4,000 रुपये क्विंटलवर पोहचला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news