Private School Management: खासगी शाळा व्यवस्थापनांवर थेट गुन्हा दाखल होणार; बनावट कागदपत्रांना आळा घालण्यासाठी अध्यादेश

Private school management: खासगी शाळा व्यवस्थापनांवर थेट गुन्हा दाखल होणार; बनावट कागदपत्रांना आळा घालण्यासाठी अध्यादेश
Private School
Private SchoolPudhari News Network
Published on
Updated on

पुणे : काही शैक्षणिक व्यवस्थापनांकडून कागदपत्रांमध्ये फेरफार, चुकीची माहिती किंवा माहिती दडपून प्रस्ताव सादर केल्याच्या घटना घडतात. त्यामुळे याबाबत संबंधितांवर कारवाई होणे आवश्यक आहे. परंतु, याप्रकरणी केवळ कर्मचारी व अधिकारी यांच्यावरच कारवाई होते. परंतु, यापुढील काळात संबंधित खासगी व्यवस्थापन किंवा व्यक्तींवर बनावट कागदपत्रे तयार किंवा सादर केल्याप्रकरणी दखलपात्र गुन्हा दाखल केला जाणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे यासंदर्भातील अध्यादेश प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Private School
Sugar Price Hike: फेब्रुवारीसाठी साखरेचा कोटा कमी; साखर दरात प्रतिक्विंटल 100 रुपयांची उसळी

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना वैयक्तिक मान्यता अनियमिततेप्रकरणी कारवाईला सामोरे जावे लागते. परंतु, ज्या व्यवस्थापनाने मूळ नियुक्ती प्रक्रियेत अनियमितता केलेली आहे, त्यांच्यावर कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही. त्यामुळे शासनाच्या ध्येयधोरणांची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. त्याअनुषंगाने राज्यातील खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यतेसंबंधी क्षेत्रीय स्तरावरील सक्षम प्राधिकारी यांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत राज्य शासनातर्फे सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

Private School
Adachiwadi Village Development: आडाचीवाडीचा विकास मॉडेल अभ्यासण्यासाठी ‘यशदा’अंतर्गत 40 गटविकास अधिकाऱ्यांचा दौरा

राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयानुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता प्रदान करीत असताना संबंधित सक्षम प्राधिकारी यांनी शासन निर्णय 6 फेबुवारी 2012 व शासन निर्णय 10 जून 2022 मधील तरतुदींबरोबरच काही बाबींची तपासणी करणे आवश्यक आहे. त्यात प्रशासकीय नोंदणी तपासणी, त्यात संबंधित कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसंदर्भात संस्थेचा ठराव, नियुक्ती आदेश आणि प्रत्यक्ष रुजू झाल्याचा अहवाल तपासावा.

Private School
Sodium Ion Battery: पुण्यात तयार झाली देशातील पहिली सोडियम बॅटरी; लिथियमला स्वदेशी पर्याय

त्याचबरोबर संबंधित कर्मचाऱ्यांच्या शाळेचा प्रत्यक्ष हजेरीपट आणि संस्थेच्या तसेच कार्यालयाच्या आवक-जावक नोंदवहीतील नोंदीची पुनश्च पडताळणी करणे आवश्यक आहे. संबंधित भरती प्रचलित कार्यपद्धती आणि वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन आदेशानुसार आहे की नाही, याची खात्री करणे अनिवार्य आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता अनियमिततेप्रकरणी जबाबदार व्यवस्थापन व व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news