Edible Oil Pudhari
पुणे

Pune Grocery Market Rates: पुण्यात किराणा बाजारात मंदी; गुळाचे दर वाढले, खाद्यतेल स्वस्त

ग्राहकांची वर्दळ घटल्याने व्यवहार मंदावले; धान्य-साखर दर स्थिर

पुढारी वृत्तसेवा

पुणे: बाजारातील ग्राहकांची वर्दळ या आठवड्यात लक्षणीयरीत्या कमी झाल्याने बहुतांश किराणा जिनसांच्या खरेदी-विक्रीला अपेक्षित उठाव मिळालेला नाही. परिणामी, बहुतांश वस्तूंचे दर स्थिर राहिले असले, तरी काही महत्त्वाच्या जिनसांमध्ये किरकोळ चढ-उतार दिसून आले. उसाच्या तुटवड्याचा थेट परिणाम गूळ बाजारावर होत असून, गुळाच्या भावात क्विंटलमागे सुमारे 100 रुपयांची वाढ नोंदवली गेली. विशेषतः दौंड तालुक्यातील गुऱ्हाळे उसाअभावी मोठ्या प्रमाणात बंद असल्याने गुळाची आवक घटली. त्याचा परिणाम दरवाढीत दिसून येत आहे.

दुसरीकडे साखरेचे दर सध्या स्थिर असले, तरी लग्नसराईचा हंगाम आणि वाढते तापमान, यामुळे आगामी काळात साखरेची मागणी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, ग्राहकांकडून मागणी कमी झाल्याने खाद्यतेलाच्या दरात काहीशी नरमाई दिसून आली असून, 15 किलो/लिटरच्या डब्यामागे सुमारे 50 रुपयांची घट झाली आहे. धान्यबाजारात मात्र मागणी आणि पुरवठा यामध्ये संतुलन असल्याने सर्व प्रकारच्या धान्यांचे दर स्थिर राहिले आहेत. याशिवाय लाल मिरची, नारळ आणि धने यांसारख्या जिनसांच्या किमतीतही मागील आठवड्याच्या तुलनेत कोणताही विशेष बदल झालेला नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. एकूणच, बाजारात सध्या मंदीचे वातावरण असून, मर्यादित व्यवहारांमुळे दरांमध्ये मोठे चढ-उतार दिसून येत नाहीत.

येथील घाऊक बाजारातील शनिवारचे दर पुढीलप्रमाणे होते:

साखर (प्रतिक्विंटल) 4050-4070 रु. खाद्यतेले (15किलो/लिटर) : शेंगदाणा तेल 2650-2900, रिफाइंड तेल 2250-3100, सरकी तेल 2100-2500, सोयाबीन तेल 2150-2450, पामतेल 2150-2350, सूर्यफूल रिफाइंड तेल 2350-2500, खोबरेल तेल 4300, वनस्पती 1820-2300 रु. तांदूळ : गुजरात उकडा 3500-4000, मसुरी 3100-3500, सोना मसुरी 4150-5000, एच. एम. टी. कोलम 5300-5600, लचकारी कोलम 6100-6600, चिन्नोर 4500-5000, 1121-11500-12500, आंबेमोहर (सुवासिक) 14500-16500, बासमती अखंड 12500-14500, बासमती दुबार 10000-10500, बासमती तिबार 10500-11000, बासमती मोगरा 6000-6500, बासमती कणी 4500-5000, 1509-1000-11000, इंद्रायणी 7000 रु.

गहू - लोकवन नं. 1 4150-4400, लोकवन नं. 2 3700-3900, नं.3 3075-3650, सिहोर नं. 1 5900-6500, सिहोरी 3850-4450, मिलबर 2850-2900 रु. ज्वारी : गावरान नं. 1 5700-6500, गावरान नं.2 5200-5500, नं.3 4700-5100, दूरी नं.1 3800-4000, दूरी नं. 2 3500-3700 रु बाजरी:- महिको नं.1 3800-4000, महिको नं.2 3400-3600, गावरान 3300-3500, हायब्रीड 3050-3300रु.

गूळ :- गूळ नं. 1 4600-4800, गूळ नं.2 4450-4550 गूळ नं.3 4300-4400, बॉक्स 4500-5500 रु. डाळी:- तूरडाळ 10000-12600, हरभराडाळ 6700-7000, मूगडाळ 9800-10000, मसूरडाळ 7650-7800, मटकीडाळ 8200-8300, उडीदडाळ 10000-12000 रु. कडधान्ये:-हरभरा 6000-6500, हुलगा 5200-5700, चवळी 7900-10500, मसूर 7600-8500, मूग 9500-9800, मटकी गावरान 9600-16000, मटकी पॉलिश 6800-7700, मटकी गुजरात 14000-16000, मटकी राजस्थान 6500-7500, मटकी सेलम 16000-17700, वाटाणा हिरवा 5400-6000, वाटाणा पांढरा 4900-5200, काबुली चणा 7400-11200 रु.

साबुदाणा :-साबुदाणा नं.1 6200, साबुदाणा नं.2 5800, साबुदाणा नं.3 5600 रु. वरई भगर :-13000-13500, सावा भगर 12500-13000 रु. गोटा खोबरे 4200-4500 रु. शेंगदाणा :- जाडा 11300-12800, स्पॅनिश12500-13500, घुंगरु 11500-12500 धने :- गावरान 12000-13000, इंदूर 15000-17000 इंदुर सुपर 25000-30000 रु. पोहे :- मध्य प्रदेश 4600-4900,पेण 4600-4800, मध्यम पोहा 4600-4800, दगडी पोहा 4800-5100, पातळ पोहा 5200-5800, सुपर पोहा 5200-5800, भाजका पोहा 650-750, मका पोहा 550-650, भाजके डाळे 3200-3800, मुरमुरा सुरती (9किलोस) 560, भडंग 850-1100, घोटी 540 रु. रवा, मैदा, आटा- (50 किलोचा भाव) आटा 1600-1650, रवा 1650-1750, मैदा 1650-1750, बेसन:- (50 किलोस) 3600-4250 रु. मिरची: काश्मीरी ढब्बी 6000-65000, ब्याडगी 35000-50000, लवंगी तेजा 21000-22000, गुंटूर 24000-26000, खुडवा गुंटूर 12000-13000, खुडवा ब्याडगी 16000-18000 रु. नारळ :- (शेकड्याचा भाव): नवा पॅकिंग 1700-1850.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT