LPG Gas Pudhari
पुणे

Pune Gas Cylinder Black Marketing: गॅस सिलिंडर काळाबाजार रोखण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासन अलर्ट

विशेष दक्षता पथके स्थापन; एजन्सी व गोदामांवर अचानक छापे टाकण्याचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

पुणे: गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर असून, यासाठी विशेष दक्षता पथक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांना योग्य दरात गॅस उपलब्ध व्हावा आणि काळाबाजार करणाऱ्यांवर लगाम बसावा, यासाठी जिल्हा पुरवठा विभागाला ही मोहीम सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.

युद्धजन्य परिस्थितीमुळे अलीकडील काळात घरगुती गॅस सिलिंडरची टंचाई निर्माण झाल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे येत होत्या. काही ठिकाणी गॅस एजन्सीमधून सिलिंडर बाहेर काढून त्यांची जास्त दराने विक्री होत असल्याची माहितीही समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी पुरवठा विभागाला विशेष तपासणी मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. याअंतर्गत जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसीलदार, अन्न व औषध प्रशासन, तसेच पोलिस विभागाच्या समन्वयातून विशेष दक्षता पथके तयार केली जाणार आहेत. ही पथके शहर व ग््राामीण भागातील गॅस एजन्सी, गोदामे आणि वितरण केंद्रांवर अचानक छापे टाकून तपासणी करणार आहेत. अनियमितता आढळल्यास संबंधितांवर अत्यावश्यक वस्तू कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

गॅस सिलिंडरचा साठा, वितरणाची नोंद, ग््रााहकांना दिलेले सिलिंडर आणि औद्योगिक वापरासाठी होणारी विक्री याची तपशीलवार पडताळणी केली जाणार आहे. काळाबाजारात सिलिंडर विक्री करणाऱ्यांना दंडासह परवाना रद्द करण्याची कारवाईही केली जाईल, असे जिल्हा पुरवठा विभागाने सांगितले. दरम्यान, गॅस सिलिंडरचा जादा दराने विक्री होत असल्यास किंवा काळाबाजाराची माहिती असल्यास नागरिकांनी तत्काळ जिल्हा प्रशासनाच्या हेल्पलाईनवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांच्या सहकार्याने ही मोहीम प्रभावीपणे राबवून गॅस वितरण व्यवस्था पारदर्शक ठेवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.फ

‌‘तक्रारी प्राधान्याने सोडवाव्यात‌’

ग््रााहकांच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन त्या प्राधान्याने सोडवाव्यात, ग््रााहकांच्या हक्काचे उल्लंघन होणार नाही, यादृष्टीने सर्व संबंधित विभागाने कार्यवाही करावी, जिल्ह्यात 15 मार्च रोजी जागतिक ग््रााहक दिनानिमित्त तालुकास्तरावर कार्यक्रमाचे आयोजन करून ग््रााहकांचे हक्क व कर्तव्याविषयी जनजागृती करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा ग््रााहक संरक्षण परिषद बैठकीत ते बोलत होते. या वेळी जिल्हा ग््रााहक संरक्षण परिषदेचे शासकीय तसेच अशासकीय सदस्य, जिल्हा पुरवठा अधिकारी तथा परिषदेचे सचिव महेश सुधाळकर, परिवहन अधिकारी, पोलीस, महावितरण आदी उपस्थित होते.

नियमांचे पालन न करणाऱ्यावर कारवाई

सदस्यांनी ग््रााहकांच्या सेवांबाबत मांडलेल्या सूचना विचारात घेता सकारात्क विचार करू न कार्यवाही करण्यात येईल. या सूचनांचा बैठकीच्या इतिवृत्तात समावेश करून सर्व संबंधित विभाग तसेच सदस्यांना इतिवृत्त उपलब्ध करून द्यावे. या इतिवृत्तानुसार संबंधित विभागाने त्वरित कार्यवाही करून आगामी बैठकीपूर्वी अनुपालन अहवाल सादर करावा. त्या नियमांचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असेही डुडी यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT