Pune Municipal Corporation Hall Renovation: पुणे महापालिकेच्या जुन्या सभागृहाचे 2.22 कोटींत नूतनीकरण

आधुनिक बैठक कक्ष उभारणीचा निर्णय; 150 जणांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार
Pune Municipal Corporation Hall Renovation
Pune Municipal Corporation Hall RenovationPudhari
Published on
Updated on

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीतील जुन्या सर्वसाधारण सभागृहाचे लवकरच नूतनीकरण करण्यात येणार असून, या सभागृहाला आधुनिक आणि अत्याधुनिक स्वरूप देण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. या ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत बैठक कक्ष उभारण्यात येणार असून, त्यासाठी सुमारे 2.22 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रस्तावाला महापालिकेच्या पूर्वगणनपत्रक समितीने मंगळवारी (दि. 10) झालेल्या बैठकीत मान्यता दिली.

Pune Municipal Corporation Hall Renovation
Pune Municipal Budget 2026: पुणे महापालिकेचा 13,995 कोटींचा अर्थसंकल्प सादर; स्थायी समितीकडून बदलांची शक्यता

नव्या प्रशासकीय इमारतीत भव्य सर्वसाधारण सभागृह उभारल्यानंतर या जुन्या सभागृहाचा वापर प्रामुख्याने लहान कार्यक्रम, बैठक आणि विविध उपक्रमांसाठी केला जात होता. मात्र, वाढत्या प्रशासकीय कामकाजामुळे मोठ्या आणि सुसज्ज बैठक कक्षाची गरज भासत असल्याने या सभागृहाचे नूतनीकरण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. नूतनीकरणानंतर या सभागृहात 135 ते 150 व्यक्ती बसू शकतील अशी बैठक व्यवस्था केली जाणार आहे. यामध्ये मोठ्या आकाराचे यू-आकाराचे टेबल, आरामदायी खुर्च्या, प्रत्येक आसनासाठी मायक्रोफोन, प्रोजेक्टर स्क्रीन आणि अन्य डिजिटल सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे बैठका अधिक परिणामकारक आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम पद्धतीने पार पाडता येणार आहेत.

Pune Municipal Corporation Hall Renovation
Bhigwan Ghost Rumor Case: भिगवण परिसरात ‘भुताटकी’ची अफवा; दारू-गांजाच्या नशेतून प्रकार घडल्याचे डॉक्टरांचे मत

जुन्या इमारतीतील या सभागृहाला ऐतिहासिक महत्त्वही लाभले आहे. महापालिकेच्या अनेक महत्त्वाच्या निर्णयांची साक्षीदार असलेल्या या सभागृहाला नव्या स्वरूपात पुनरुज्जीवन देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे. नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतर येथे महापालिकेच्या महत्त्वाच्या धोरणात्मक बैठका, प्रशासकीय चर्चा तसेच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदांचे आयोजन करण्यासही सुविधा उपलब्ध होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news