Fruits Pudhari
पुणे

Pune Fruit Market Rates: गणेशोत्सवामुळे फळांना झळाळी; पुण्याच्या मार्केट यार्डात बहुतांश फळे १० टक्क्यांनी महागली

बाप्पाच्या नैवेद्यासाठी फळांची मागणी वाढली; डाळिंब, सफरचंद, पेरू, सीताफळाची आवक वाढली, ड्रॅगन फ्रूट, अननस, संत्रा-मोसंबीचे दर स्थिर

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरात सार्वजनिक तसेच बहुतांश घरोघरी गणरायाचे आगमन होते. या वेळी बाप्पाच्या पूजेसह नैवेद्य म्हणून फळे अर्पण केली जातात. त्या पार्श्वभूमीवर गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात फळांना मागणी वाढली आहे. बाजारात सर्व प्रकारच्या फळांची आवकही वाढली आहे.


Pune Fruit Market News

आवकेच्या तुलनेत मागणी वाढल्याने बहुतांश फळांच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर ड्रॅगन, अननस, संत्रा आणि मोसंबीची आवक-जावक कायम असल्याने त्यांचे दर टिकून आहेत.

गुलटेकडी येथील मार्केट यार्ड येथील फळबाजारात रविवारी (दि.१३) लिंबू ६०० ते ७०० गोणी, मोसंबी ८० ते २० टन, संत्रा १५ ते २० टन, डाळिंब १३० ते १४० टन, पपई ७ ते ८ टेम्पो, कलिंगड ७ ते ८ गाड्या, खरबूज ३ ते ४ टेम्पो, चिकू ४०० ते ५०० डाग, पेरू १२०० ते १३०० क्रेट, पिअर ५ गाड्या, सीताफळ २० ते ३० टन, सफरचंद तीन ते साडेतीन हजार बॉक्स आणि अननसाची ६ ट्रक इतकी आवक झाली होती.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : ६०० ते ३०००, मोसंबी : (३ डझन) : ११०-२८० (४ डझन) : ४०-१००, संत्रा : (१० किलो) : ३५०-११००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा ६०-१६०, आरक्ता : २५-७०, गणेश २०-४०, कलिंगड : १०-१५, खरबूज : २०-५०, पपई : २०-४०, चिक्कू (दहा किलो) : १००-७००, पेरु (२० किलो) ५००-८००, अननस (१ डझन) : ३००-९००, सिताफळ (१ किलो) : २०-१५०, पिअर (२४ ते २५ किलो) : ३५००-४०००. सफरचंद -रॉयल गाला (१४ किलो) २७००-२८००, काश्मीर (१० किलो) २१००-२२००.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT