पुणे: देशाच्या पूर्व किनारपट्टीवर मासेमारी बंदी लागू झाल्याने होड्या किनाऱ्यावर परतल्या आहेत. सद्यःस्थितीत पश्चिम किनारपट्टीवरून मासळी बाजारात दाखल होत आहे. बाजारातील मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने मासळीचे तेजीतील दर टिकून आहेत.
उन्हाचा वाढलेला चटका, त्यात व्यावसायिक गॅसपुरवठा विस्कळीत असल्याने हॉटेल-खानावळीतून चिकनला मागणी घटली आहे. दरम्यान, मागणीइतकाच पुरवठा होत असल्याचे चिकनचे गत आठवड्यातील दर टिकून आहेत. युद्धजन्य परिस्थितीमुळे इंग्लिश अंडीच्या निर्यातीवर परिणाम झाल्याने बाजारात मुबलक इंग्लिश अंडी उपलब्ध आहेत.
मागील आठवड्यात झालेल्या दर घसरणीमुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने रविवारी इंग्लिश अंडीचा दर शेकड्यामागे 35 रुपयांनी वाढल्याचे सांगण्यात आले. तर, मटण आणि गावरान अंडीचे भाव स्थिर होते. रविवारी बाजारात (दि. 29) खोल समुद्रातील मासळी 10 ते 15 टन, खाडीच्या मासळीची सुमारे 200 ते 250 किलो आणि नदीच्या मासळीची 500 ते 700 किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कटला आणि सिलनची सुमारे 15 ते 20 टन इतकी आवक झाली होती.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) - पापलेट : कापरी : 1800-2000, मोठे : 1600-1800, मध्यम : 1300-1500, लहान : 1100-1200, भिला : 800-900, हलवा : 800-900, सुरमई 900-1200, रावस : 900-1000, घोळ : 900-1000, करली : 350-400, करंदी : 450-500, भिंग : 350-400, पाला : 1200-1400, वाम : पिवळी 300-500600-1000, काळी : 300-400, ओले बोंबील : 400-500. कोळंबी : लहान : 250-300, मोठी : 400-600, जम्बो प्रॉन्स : 1400-1500, किंग प्रॉन्स : 750-850, लॉबस्टर : 2000-2200, मोरी : 350-450, मांदेली : 120-160, राणीमासा : 250-300, खेकडे : 300-400, चिंबोऱ्या : 700-800.
खाडीची मासळी - सौंदाळे : 250-300, खापी : 250-300, नगली : 550-600, तांबोशी : 500-600, पालू : 250-300, लेपा : 350-400, बांगडा : 200-300, शेवटे : 300-350, पेडवी : 150, बेळुंजी : 150-200, तिसऱ्या : 250-300, खुबे : 150-200, तारली : 200-250. नदीतील मासळी : रहू : 140-180, कतला : 180-220, मरळ : 350-450, शिवडा : 250, खवली : 200-250, आम्ळी : 150-180, खेकडे : 250-400, चिलापी : 80-180, वाम : 500-550. मटण : बोकडाचे 800, बोलाईचे 800, खिमा 800, कलेजी 840. चिकन 260, लेगपीस 320, जिवंत कोंबडी 200, बोनलेस 360. अंडी : गावरान (शेकडा) 1120 डझन 140, प्रतिनग 12. इंग्लिश (शेकडा) 470, डझन 66, प्रतिनग 5.50.