Fish  Pudhari
पुणे

Pune fish Market Rates: पुणे बाजारात मासळी दर तेजीतच; इंग्लिश अंडी स्वस्त

मासळीची आवक घटली तरी दर स्थिर; उष्णतेमुळे इंग्लिश अंडीच्या मागणीत घट, शेकड्यामागे २० रुपयांनी घसरण

पुढारी वृत्तसेवा

पुणे: मासेमारीदरम्यान मुबलक मासळी उपलब्ध होत नसल्याने स्थानिक बाजारपेठेसह गणेश पेठ येथील मासळी बाजारात मासळीची आवक घटली आहे. बाजारातील आवक-जावक कायम असल्याने मासळीचे गत आठवड्यातील तेजीतील दर कायम आहेत. याखेरीज मटण, चिकन आणि गावरान अंडीचे दरही टिकून आहेत. वातावरणात उष्णता वाढू लागल्याने इंग्लिश अंडीच्या मागणीत घट झाली आहे. परिणामी, त्याच्या भावात शेकड्यामागे वीस रुपयांनी घट झाली आहे.

रविवारी बाजारात (दि. 1) खोल समुद्रातील मासळी 10 ते 15 टन, खाडीच्या मासळीची सुमारे 150 ते 200 किलो आणि नदीच्या मासळीची 500 ते 700 किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कटला आणि सिलनची सुमारे 15 टन इतकी आवक झाली होती.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) -

पापलेट : कापरी : 1800-2000, मोठे : 1600-1800, मध्यम : 1300-1500, लहान : 1100-1200, भिला : 1000-1100, हलवा : 650-800, सुरमई 800-1000, रावस : 750-850, घोळ : 900-1000, करली : 350-400, करंदी : 450-500, भिंग : 400-500, पाला : 900-1200, वाम : पिवळी 800-1200, काळी : 250-350, ओले बोंबील : 300-400.

कोळंबी : लहान : 320-400, मोठी : 450-700, जम्बो प्रॉन्स : 1400-1500, किंग प्रॉन्स : 750-850, लॉबस्टर : 1800-2200, मोरी : 350-400, मांदेली : 120-160, राणीमासा : 250-300, खेकडे : 350-450, चिंबोऱ्या : 650-750. खाडीची मासळी - सौंदाळे : 250-300, खापी : 350-400, नगली : 550-600, तांबोशी : 550-650, पालू : 240-280, लेपा : 350-400, बांगडा : 200-240, शेवटे : 350-400, पेडवी : 150-200, बेळुंजी : 140-160, तिसऱ्या : 250-300, खुबे : 120-150, तारली : 200-240.

नदीतील मासळी : रहू : 140-180, कतला : 160-200, मरळ : 350-450, शिवडा : 150-200, खवली : 200-250, आम्ळी : 140-160, खेकडे : 250-400, चिलापी : 60-160, वाम : 450-550. मटण : बोकडाचे 800, बोलाईचे 800, खिमा 800, कलेजी 840. चिकन 240, लेगपीस 300, जिवंत कोंबडी 180, बोनलेस 340. अंडी : गावरान (शेकडा) 1220 डझन 150, प्रतिनग 14. इंग्लिश (शेकडा) 575, डझन 78, प्रतिनग 6.50.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT