

पुणे: महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांच्या 10 जागांसाठी जवळपास 400 जण इच्छुक असल्याचे समोर आले आहे. त्यात भाजपकडे सर्वाधिक 300पेक्षा अधिक इच्छुक असून, राष्ट्रवादी काँग््रेासकडे 75 जणांनी अर्ज केले आहेत. तर, काँग््रेासच्या एक जागेसाठी तब्बल 15 जणांनी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे नेत्यांची मात्र डोकेदुखी वाढली आहे.
महापालिका निवडणुकीनंतर आता स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीकडे लक्ष लागले आहे. महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी सर्व गटनेत्यांना पत्र देऊन स्वीकृत सदस्य नेमणुकीसाठी नावे देण्यास सांगितले आहे. त्यासाठी 9 मार्च ही अखेरची मुदत आहे. महापालिकेत इच्छुक 10 स्वीकृत सदस्यांच्या नेमणुका होणार आहेत.
त्यात भाजपचे सर्वाधिक 7, राष्ट्रवादी काँग््रेास 2, काँग््रेास 1 या पद्धतीने नेमणुका होणार आहेत. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांतील इच्छुकांची लगबग वाढली आहे. त्यासाठी इच्छुकांकडून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे जोरदार लॉबिंग सुरू आहे.
दरम्यान, केवळ 10 जागा असतानाही इच्छुकांची संख्या 400 च्या जवळपास असल्याने आता स्वीकृत सदस्य निवडताना नेत्यांचा कस लागणार आहे. सध्या इच्छुकांच्या शिफारशी आणि लॉबिंगमुळे सर्वच नेते वैतागून गेले असल्याचे चित्र आहे.
भाजपकडे इच्छुकांची संख्या 300 पेक्षा अधिक
भाजपकडे सर्वाधिक जागा असल्याने इच्छुकांची संख्याही मोठी आहे. शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपकडे इच्छुकांची संख्या 300 पेक्षा अधिक आहे. तर, राष्ट्रवादी काँग््रेासच्या दोन जागांसाठी 75 जणांनी पक्षाकडे अर्ज केले असल्याचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी सांगितले. काँग््रेासकडे एका जागासाठी जवळपास 15 इच्छुक असल्याचे सांगण्यात आले.