पुणे: नवरात्रोत्सव सुरू असल्याने बाजारातील मागणीनुसार व्यापाऱ्यांकडून मासळी मागविण्यात येत आहे. मागणीच्या तुलनेत पापलेट आणि रावसची आवक कमी पडल्याने त्याच्या दरात पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागणी आणि पुरवठा, यातील समतोलामुळे मटण, चिकन आणि अंड्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर):
पापलेट : कापरी : १८००-२०००, मोठे : १५००-१८००, मध्यम : १२००-१५००, लहान : ८००-९००, भिला : ५००-७००, हलवा : ६००-७००, सुरमई ५००-७००, रावस : ८००-९००, घोळ : ६००-८००, करली : ३००-४००, भिंग : ४००-५००, पाला : लहान : ६००-७०० मोठा : १२००-१५००, वाम : पिवळी ६००-८००, काळी : ३००-४००, ओले बोंबील : १००-२००.
कोळंबी : लहान : १५०-२४०, मध्यम : ३५०-४८०, मोठी : ६००-८००, जम्बो प्रॉन्स : १४००-१५००, किंग प्रॉन्स : ७००-८००, लॉबस्टर : २०००-२२००, मोरी : १५०-२००, मांदेली : १००-१४०, राणीमासा : २००-२४०, खेकडे : ३००-३५०, चिंबोर्या : ६००-८००.
नदीतील मासळी : रहू : १६०-२००, कतला : १८०-२२०, मरळ : ३५०-४००, शिवडा : १८०-२००, खवली : १८०-२००, आम्ळी : ८०-१४०, खेकडे : २५०-३००, वाम : ४००-४५०. मटण : ८४०, कलेजी ८८०. चिकन २५०, लेगपीस ३००, जिवंत कोंबडी १७०, बोनलेस ३५०. अंडी : गावरान (शेकडा) १२१० डझन १५६, प्रतिनग १३. इंग्लिश (शेकडा) ६००, डझन ८४, प्रतिनग ७.००