पुणे: देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीहून गणेश पेठ येथील मासळीबाजारात मासळी दाखल होत आहे. नवरात्रोत्सव सुरू झाल्याने बाजारातील मागणीनुसार व्यापाऱ्यांकडून मासळी मागविण्यात येत आहे. बाजारात बांगडा, कोळंबी, बोंबील आणि सुरमईची आवक अधिक आहे.
मागणीच्या प्रमाणातच आवक होत असल्याने पापलेट वगळता अन्य सर्व मासळीचे दर गत आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. मात्र, मागणीच्या तुलनेत पापलेटची आवक कमी पडल्याने त्याच्या दरात पाच ते दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे मटण, चिकन आणि अंडीचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत.
गणेश पेठ येथील घाऊक बाजारात रविवारी (दि. ११) खोल समुद्रातील मासळी ७ ते ८ टन, खाडीच्या मासळीची सुमारे १०० ते २०० किलो आणि नदीच्या मासळीची २०० ते ३०० किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून सुमारे ८ ते १० टन इतकी आवक झाली.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर):
पापलेट : कापरी : १६००-२२००, मोठे : १५००-१६००, मध्यम : १२००-१४००, लहान : ८००-९००, भिला : ७००-८००, हलवा : ५५०-६००, सुरमई ४००-६००, रावस : ७००-८००, घोळ : ६००-७००, करली : २५०-३००, करंदी : ४००, भिंग : २५०-३००, पाला : १२००-१५००, वाम : २००-८००, ओले बोंबील : ८०-१६०. कोळंबी : लहान : १६०-२००, मोठी : ५५०-६५०, जम्बो प्रॉन्स : १५००, किंग प्रॉन्स : ८००-८५०, लॉबस्टर : २०००-२२००, मोरी : २५०-३००, मांदेली : १२०-१६०, राणीमासा : २००-२५०, खेकडे : २५०-३५०, चिंबोर्या : ६५०-७००.
खाडीची मासळी:
सौंदाळे : २००-२४०, खापी : २००-२५०, नगली : ३५०-४००, तांबोशी : ४००-५००, पालू : २००-२५०, लेपा : १२०-३००, बांगडा : १६०-२५०, शेवटे : २००-२५०, पेडवी : १२०-१६०, बेळुंजी : १२०-१६०, तिसर्या : २५०-३००, खुबे : १००-१५० तारली : १६०-२००. नदीतील मासळी : रहू : १४०-२००, कतला : १६०-२००, मरळ : ३५०-४००, शिवडा : २००-२५०, खवली : २००-२५०, आम्ळी : १२०-१६०, खेकडे : २५०-३००, वाम : ३५०-४००. मटण : बोकडाचे ८००, बोलाईचे ८००, खिमा ८००, कलेजी ८४०. चिकन २१०, लेगपीस २६०, जिवंत कोंबडी १४०, बोनलेस ३००. अंडी : गावरान (शेकडा) ११२० डझन १४०, प्रतिनग १२. इंग्लिश (शेकडा) ५६०, डझन ८४, प्रतिनग ७.