Pune Flower Market Rates: नवरात्रोत्सवात फुलांना मोठा भाव! जुई, मोगरा हजाराच्या पार; दोन दिवसांत किलोमागे ८०० रुपयांची वाढ

पुण्याच्या मार्केट यार्डातील फूलबाजार फुलला; मागणी वाढली, आवक घटली, गजरे आणि वेण्यांसाठी सुवासिक फुलांना सर्वाधिक पसंती
Mogra
MograPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुलटेकडी मार्केट यार्डातील फूलबाजार सुवासिक फुलांनी दरवळला आहे. देवीच्या पूजेसह केसांमध्ये माळण्यासाठी गजरे आणि वेण्यांना मागणी वाढल्याने जुई, चमेली, मोगरा अन्‌ कागड्याच्या फुलांना चांगलाच भाव मिळू लागला आहे. मागणीच्या तुलनेत आवक अपुरी पडत असल्याने दोन दिवसांत फुलांचा प्रतिकिलोचा दर सहाशे ते आठशे रुपयांनी वाढला आहे. जुईचा आणि मोगऱ्याचा किलोचा दर एक हजार ते बाराशे रुपयांवर, तर चमेलीचा दर बाराशे रुपयांवर पोहोचला आहे. तर, कागड्याच्या एक किलोच्या बंडलला ६०० ते ८०० रुपयांचा भाव मिळत आहे.

Mogra
Pune Navratri Traffic Changes: पुण्यात नवरात्रोत्सवासाठी वाहतुकीत मोठे बदल; तांबडी जोगेश्वरीसह चार मंदिरांजवळ निर्बंध

शहराच्या लगतला भाग असलेल्या सोरतापवाडी, म्हातोबाची आळंदी आणि कुंजीरवाडी परिसरातून जुई, तर तळेगाव ढमढेरे भागातून चमेलीची आवक होत आहे. याखेरीज, कर्नाटकातून मोगरा तसेच कागड्याच्या तयार गजऱ्याची बंडल बाजारात दाखल होतात. शनिवारी जुईची २०० ते ३०० किलो, चमेली अवघी सात ते आठ किलो आणि मोगरा आणि कागड्याच्या बंडलची सातशे ते आठशे किलोंची आवक झाली.

Mogra
Smita Jadhav: पुणे पदवीधर निवडणूक: डॉ. स्मिता जाधव यांना फायनान्स कर्मचारी असोसिएशनचा पाठिंबा

नवरात्रौत्सवाला आजपासून (दि. ११) प्रारंभ होत आहे. त्यामुळे शनिवारी फूलबाजारात गजरे तयार करणारे व्यावसायिक आणि किरकोळ विक्रेत्यांची खरेदीसाठी लगबग दिसून आल्याचे निरीक्षण अडते असोसिएशनचे अध्यक्ष अरुण वीर यांनी नोंदविले. बाजारात कागडा, जुई आणि चमेलीपासून तयार होणाऱ्या गजऱ्यांची प्रत्येकी २० ते ५० रुपयांना विक्री होत असल्याचे दिसून आले.

Mogra
Sachin Bangar: पदवीधर निवडणुकीत सचिन बांगर यांची माघार; स्मिताताई जाधव यांना पाठिंबा

झेंडू, शेवंती, गुलछडीलाही आला भाव

मंदिरात करण्यात येणाऱ्या सजावटीसह देवीच्या पूजेसाठी बाजारात झेंडू, गुलछडी, शेवंती आणि ऑस्टरच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. बाजारात पुणे जिल्ह्यासह सोलापूर, सातारा, सांगली आणि बीड जिल्ह्यातून झेंडूची आवक होत आहे. सध्या घाऊक बाजारात दर्जानुसार झेंडूला प्रतिकिलो २० ते ५० रुपये, शेवंतीला १०० ते १६० रुपये, गुलछडीला २५० ते ४०० रुपये, तर ॲस्टरला ८० ते १२० रुपये दर मिळत आहे.

Mogra
Pune Mamarao Date Printing Press: पुणे महापालिकेच्या ऐतिहासिक मुद्रणालयाचे अस्तित्व धोक्यात; मामाराव दाते मुद्रणालयाला टाळे

नवरात्रौत्सवामुळे गजरे आणि वेण्यांसाठी सुवासिक फुलांना, तर पूजेच्या अनुषंगाने झेंडू, शेवंती, गुलछडी आणि ॲस्टरला मागणी वाढली आहे. विशेषतः सुवासिक असलेल्या जुई, चमेली आणि कागड्याला चांगला उठाव आहे. मागणीच्या तुलनेत आवक मर्यादित असल्याने दोन दिवसांत दर वधारले आहेत. नवरात्रौत्सव तसेच दसऱ्यापूर्वीचे दोन दिवस फुलांना फुलांचे दर तेजीत राहण्याची शक्यता आहे.

सागर भोसले, समन्वयक, अखिल पुणे फूलबाजार अडते असोसिएशन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news