Pune Navratri Traffic Changes: पुण्यात नवरात्रोत्सवासाठी वाहतुकीत मोठे बदल; तांबडी जोगेश्वरीसह चार मंदिरांजवळ निर्बंध

११ ऑक्टोबरपासून काही रस्ते बंद, तर काही मार्गांवर एकेरी वाहतूक; भाविकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
Pune Road Diversion
Pune Road DiversionPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त शहरातील विविध मंदिरांच्या परिसरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता तात्पुरते वाहतूक बदल करण्यात आले आहेत. श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर, श्री चतु:शृंगी मंदिर, भवानी पेठेतील श्री भवानीमाता मंदिर, सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात हे वाहतूक बदल केले आहेत. या वेळी नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले.

Pune Road Diversion
Smita Jadhav: पुणे पदवीधर निवडणूक: डॉ. स्मिता जाधव यांना फायनान्स कर्मचारी असोसिएशनचा पाठिंबा

'नवरात्रौत्सवात बुधवार पेठेतील श्री तांबडी जोगेश्वरी मंदिराच्या परिसरात भाविकांची गर्दी होते. रविवारपासून (११ ऑक्टोबर) अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौकापर्यंतचा (हुतात्मा चौक) रस्ता वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. बुधवार चौक ते अप्पा बळवंत चौकदरम्यान एकेरी वाहतूक सुरू राहणार राहणार आहे,' अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डाॅ. संदीप भाजीभाकरे यांनी दिली. लक्ष्मी रस्त्यावरील गणपती चौक ते श्री तांबडी जोगेश्वरी दरम्यानचा रस्ता वाहतुकीस बंद राहणार आहे.

Pune Road Diversion
Sachin Bangar: पदवीधर निवडणुकीत सचिन बांगर यांची माघार; स्मिताताई जाधव यांना पाठिंबा

श्री तांबडी जोगेश्वरी मंदिराकडे जाणारा रस्ता अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून अन्य वाहनांनासाठी बंद राहणार आहे. मंदिर परिसरात वाहने लावण्यास मनाई आहे. तसेच शनिवार पेठेतील श्री अष्टभुजा मंदिर परिसरात वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. श्री तांबडी जोगेश्वरी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी वाहने नदीपात्रातील रस्ता, मंडईतील वाहनतळावर लावावीत.

Pune Road Diversion
Pune Mamarao Date Printing Press: पुणे महापालिकेच्या ऐतिहासिक मुद्रणालयाचे अस्तित्व धोक्यात; मामाराव दाते मुद्रणालयाला टाळे

सेनापती बापट रस्त्यावरील श्री चतु:शृंगी मंदिर परिसरात गर्दी झाल्यास या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे. या भागात गर्दी वाढल्यास सेनापती बापट रस्त्यावरील वाहतूक वेताळबाबा चौकमार्गे दीप बंगला चौक, ओम सुपर मार्केटमार्गे वळवण्यात येणार आहे. भवानी पेठेतील श्री भवानी माता मंदिर परिसरात वाहतूक बदल करण्यात येणार आहे. नेहरू रस्त्याने श्री भवानी माता मंदिराकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. नेहरू रस्ता ते श्री भवानी माता मंदिर परिसरात वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. गर्दी वाढल्यास नेहरू रस्त्यावरील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत.

Pune Road Diversion
Pune Water Cut: पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट? १५ ऑक्टोबरपासून दरमहा १० टक्के कपातीच्या सूचना

श्रीसूक्त पठणानिमित्त सोमवारी (१२ ऑक्टोबर) सकाळी ५ ते ७ दरम्यान सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात वाहतूक बदल करण्यात येणार असून, स्वारगेटकडून सारसबागमार्गे स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्याकडे जाणारा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. मित्रमंडळ चौकाकडून पूरम चौकाकडे येणारा मार्ग वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. मित्रमंडळ चौकातून येणाऱ्या वाहनांना सावरकर चौकातून सिंहगड रस्तामार्गे इच्छितस्थळी जावे, सिंहगड रस्त्याने सावरकर चौकात येणाऱ्या वाहनांनी लक्ष्मीनारायण चौकातून इच्छितस्थळी जावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news