पुणे

पुणे : कौटुंबिक न्यायालयाचे कामकाजही दोन सत्रात

स्वालिया न. शिकलगार

पुणे : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार, पुण्यातील कौटुंबिक न्यायालयातील न्यायालयीन कामकाज आजपासून (सोमवार) दोन सत्रात चालणार आहे.

कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे यांनी या संदर्भातील आदेश दिले हाेते. त्यानुसार, सकाळी अकरा ते दुपारी एक आणि दुपारी दोन ते चार अशा प्रत्येकी दोन तासांच्या सत्रांत न्यायालयीन कामकाज सुरू राहणार आहे. त्यामध्ये तातडीच्या दाव्यांवर सुनावणी होणार आहे.  पुरावा नोंदविणे, युक्तिवाद ऐकणे आदी कामे ऑनलाइन सुरू राहणार आहेत.

न्यायालयाचे कार्यालयीन कामकाज कर्मचाऱ्यांच्या पन्नास टक्के क्षमतेने सकाळी साडेदहा ते दुपारी साडेचारपर्यंत सुरू राहणार आहे. न्यायालयातील कँटीनमध्ये केवळ पार्सल सुविधा सुरू राहणार आहे. न्यायालयाच्या आवारात मास्क, सुरक्षित वावराच्या करोना प्रतिबंधक नियमांचे पालन बंधनकारक आहे.

हेही वाचलं का? 

SCROLL FOR NEXT