File Photo  
पुणे

पुणे : निवडणूक निकालानंतर कासूर्डी, तेलवडीमध्ये तणाव; पोलीस तैनात

अमृता चौगुले

नसरापूर(पुणे ) :पुढारी वृत्तसेवा : कमी मताच्या फरकाने निवडून आलेल्या गावांमध्ये तणावाचे वातावरण आहे. भोर तालुक्यातील कासुर्डी गुमा, तेलवडी, वागजवाडी, पारवडी, कुरुंगवडी येथे तणावाचे वातावरण असून त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर एका मताच्या फरकाने निवडून आलेल्या कासुर्डीमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.

निवडणुकांच्या निकालामुळे अनेक ठिकाणी कही खुशी कही गमचे वातावरण झाले आहे. भोर तालुक्यातील कासुर्डी गुमा, वागजवाडी येथे एका मताच्या फरकाने उमेदवार सरपंच म्हणून विजयी झाले आहे. त्यामुळे दोन्ही पॅनलचे जवळपास समान तुल्यबळ असताना देखील केवळ एका मताच्या फरकाने सरपंच पद हुकल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

तणावाच्या वातावरणामुळे दोन्ही गावात शुकशुकाट निर्माण झाले आहे. तर वागजवाडीमध्ये वातावरण निवळले असल्याचे पोलिसांनी सांगितले. वादग्रस्त ठिकाणी पोलीस निरीक्षक सचिन पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खामगाव उपनिरीक्षक श्रीकांत जोशी यांनी समक्ष भेटी दिल्या.

कासुर्डी गुमामध्ये झालेल्या निवडणुकीत अजय तात्याबा मालुसरे हे ३७३ एका मताने निवडून आले. तर विरोधक पॅनलचे परशुराम यांना ३७२ मते मिळाली आहे. एका मताने त्यांचा पराभव झाला आहे. तसेच वागजवाडीमध्ये देखील झालेल्या निवडणुकीत सरपंचपदासाठी पाच महिला रिंगणात उभ्या होत्या.

निकिता ज्ञानेश्वर आवाळे २२६ मते घेऊन ह्या एका मताने विजयी झाल्या आहेत. तर दिपाली ज्ञानेश्वर राऊत यांना २२५ मते पडली असून केवळ एका मताने त्यांचा पराभव झाला. वागजवाडीमध्ये काही काळ तणावाचे वातावरण होते. मात्र रात्री उशिरापर्यंत कासुर्डी व तेलवडीमध्ये पोलिसांनी गावामध्ये बंदोबस्त तैनात केला असून तर पारवडी, कुरुंगवडी गावावर देखील पोलिसांची करडी नजर ठेवली आहे.

.हेही वाचा  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT