जालना : अंबड तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींवर महिलाराज | पुढारी

जालना : अंबड तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींवर महिलाराज

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींचा निकाल लागला असून यामध्ये २३ ग्रामपंचायतींवर महिला निवडूण आल्या आहेत. ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवल्याचे दावे राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, समृद्धी पॅनल, शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना, वंचित आघाडी या पक्षांनी केले आहेत. या ग्रामपंचायत निकालात अंबड तालुक्यातील चार सर्कलमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला असून प्रस्थापित असलेल्या ग्रामपंचायतवर समृद्धी पॅनलने विजय मिळवला आहे. विजयी उमेदवारांनी मोठ्या जल्लोषात गुलालाची उधळण करत फटाके फोडून मिरवणूक काढली.

सरपंच पदाचे विजयी उमेदवार

रामगव्हाण बुद्रक : – आशा रवींद्र चेपटे, कोळीसिरसगाव,: – सर्जेराव सुदाम रंधे
सोनकपिंपळगाव : नंदिनी संतोष जगताप, नालेवाडी :- कालिंदा अरुण घुगे
पाथरवाला खुर्द : – सुमन विठ्ठलराव सुडके, अंतरवाली सराटी : कौशल्याबाई वसंतराव तारख
भांबेरी : – सपना अण्णासाहेब कनके,    दोदडगाव /सौन्दलगाव : – बंडू शंकरराव मुंडे
साडेगाव :- शिवकन्या रमेश काटमोरे, दाढेगाव/मठतांडा:- गीता आप्पासाहेब गव्हाणे
पिठोरी सिरसगाव :- कृष्णा अंबादास आटोळे, गंगाचिंचोली/इंदलगाव :- मनीषा सुधाकर हुलमुख
जामखेड : -रतन उत्तम तारडे, भिवंडी बोडखा :- चंदा रामेश्वर डावखर
पिंपरखेड खुर्द: – सुभाष दामोदर हिवराळे, लोणार भायगाव :- कासाबाई अन्ना जाधव
चिंचखेड : – नंदकिशोर निवृत्ती पैठणे, झोडेगाव /कानडगाव :- सुदाम धोंडिबा उकार्डे
शेवगा : शंकर आसाराम गायकवाड, मठजळगाव :- रखमाबाई मारोती निकाळजे
डोमेगाव :- अशोक संपतराव काळबांडे, भनग जळगाव : – सुभाष सयाजी शेळके
माळ्याचीवाडी/भोकरवाडी:- लक्ष्मी नरसिंग जारवाल, बक्षाचीवाडी/लेंभे वाडी :- सुवर्णा विलास राठोड
वाघलखेडा : परमेश्वर श्रीरंग शेळके (बिन विरोध), हस्तपोखरी : संगीता जगन्नाथ दुर्गे
शिराढोण/वाडी शिराढोण : संपत होनाजी जमधडे, भार्डी : – नवनाथ तुकाराम डोईफोडे
जोगेश्वरवाडी/विठ्ठल वाडी : राम सुखलाल राठोड, झिरपी : संदीप किसन भवर
वसंतनगर/ ईश्वरनगर /झिरपी तांडा : संगीता अशोक जाधव, दूधपुरी :- लक्ष्मीबाई पुंजाराम माळवदे
काटखेडा : रमेश सोपानराव जऱ्हाड, वडीलासुरा/लासुरा :सविता शिवाजी खरात
मार्डी : गंगासागर एकनाथ भोजने, धनगरपिंप्री : -सरस्वती कृष्णा पवार
पागीरवाडी : – गंगाधर अप्पासाहेब जामदरे, सारंगपूर : – पूजा अमोल काकडे
बठाण खुर्द : – शोभा भाऊसाहेब लिहिणार, पानेगाव : योगिता संजय सानप

Back to top button