कोल्‍हापूर : सादळे-मादळे निवडणूकीच्या निकालानंतर सत्तेसाठी जुळवाजुळव सुरू | पुढारी

कोल्‍हापूर : सादळे-मादळे निवडणूकीच्या निकालानंतर सत्तेसाठी जुळवाजुळव सुरू

शिरोली एमआयडीसी : पुढारी वृत्तसेवा : सादळे – मादळे (ता.करवीर ) येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच पदाच्या अटीतटीच्या लढतीत अपक्ष उमेदवार पंडित बिडकर यांनी २६१ मते मिळवून बाबासो पाटील यांचा ७ मतांनी पराभव करून बाजी मारली.

दोन सदस्य बिनविरोध झाल्याने पाच सदस्य पदांच्या जागांसाठी निवडणुक पार पडली.

विजयी उमेदवार आणि मते 

वर्षा मादळेकर ( १६९),छाया पोवार ( १३९),गोरखनाथ बुचडे (१८९), सतीश चौगले (१६६),सुजाता पाटील (१८९) तर अश्विनी कांबळे व भारती पाटील या बिनविरोध झाल्या आहेत.

समृद्ध पॅनेलचे चार उमेदवार निवडून आले आहेत.तर एक अपक्ष निवडून आला आहे तर दोन बिनविरोध झाले आहेत.त्यामुळे सत्तेसाठी कोण – कोण एकत्र येणार याकडे लक्ष लागले आहे.

.हेही वाचा 

कोल्हापूर : नागांव ग्रामपंचायतीत दहा वर्षानंतर सत्तांतर; सरपंचपदी विमल शिंदे 

कोल्हापूर : तरसंबळे येथे एका प्रभागात २३ डिसेंबरला होणार फेर मतदान

कोल्‍हापूर : कोरोची सरपंचपदी युतीच्या उमेदवाराचा धुव्वा उडवत अपक्ष उमेदवार 

Back to top button