Cyber Fraud Pudhari
पुणे

Pune Drop Shipping Online Fraud: ‘ड्रॉप शिपिंग’च्या आमिषाने पुण्यात २१.७० लाखांची ऑनलाइन फसवणूक; फेसबुक मैत्रीतून गंडा

बनावट वेबसाइटची लिंक पाठवून मोठ्या परताव्याचे आमिष; चंदननगर पोलिसांत अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

पुणे: फेसबुकवर मैत्री करून व्हॉट्स ॲपद्वारे संपर्क वाढवत 'ड्रॉप शिपिंग' व्यवसायात मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची २१ लाख ७० हजार ७५८ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार चंदननगर परिसरात घडला.

याप्रकरणी अज्ञात फेसबुक आयडीधारक, व्हॉट्स ॲप लिंक वापरणारे तसेच संबंधित बँक खातेधारकांविरुद्ध चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अजय लक्ष्मीनारायण बुंदेले (वय ४५, रा. भक्तमार रेसिडेन्सी, वडगाव शेरी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ मे २०२६ ते १४ जुलै २०२६ या कालावधीत ही फसवणूक झाली. आरोपीने फिर्यादी अजय बुंदेले यांना फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांच्याशी मैत्री केली. त्यानंतर व्हॉट्स ॲपवर सातत्याने संपर्क ठेवत 'ड्रॉप शिपिंग' व्यवसायाची बनावट वेबसाइटची लिंक पाठवली.

या व्यवसायात गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर आरोपीने वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये २१ लाख ७० हजार ७५८ रुपये ७४ पैसे ऑनलाइन जमा करण्यास भाग पाडले. मात्र, कोणताही परतावा न देता आरोपीने त्यांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणाचा पुढील तपास चंदननगर पोलिस करीत आहेत.

ऑनलाइन विक्रीची व्यवसाय पद्धत

ड्रॉप शिपिंग ही ऑनलाइन विक्रीची एक व्यवसाय पद्धत आहे. या पद्धतीत विक्रेता स्वतःकडे माल साठवून ठेवत नाही. ग्राहकाकडून ऑर्डर मिळाल्यानंतर ती ऑर्डर थेट उत्पादक किंवा घाऊक पुरवठादाराकडे पाठवली जाते, तोच पुरवठादार ग्राहकाच्या पत्त्यावर माल पोहोचवतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT