पुणे: नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग््रेासने वर्चस्व मिळविल्याने आता पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक आणखी चुरशीची होण्याची शक्यता आहे. या निकालाने प्रामुख्याने पुणे महापालिकेत सव्वाशे पारचा नारा देणाऱ्या भाजपसाठी राष्ट्रवादी काँग््रेासने आव्हान उभे केले आहे.
राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल रविवारी जाहीर झाले. अपेक्षेनुसार भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या, तर शिवसेना व राष्ट्रवादी काँग््रेासने अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकाविला. मात्र, पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग््रेासने 17 पैकी 10 नगराध्यक्ष पदे जिंकून भाजपला धोबीपछाड केले आहे. राज्यात गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर गेल्या वर्षभरात भाजपने जिल्ह्यात ताकद वाढविण्यासाठी कंबर कसली. भोरचे माजी आमदार संग््रााम थोपटे, पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप, इंदापूरला जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर असे मोठे प्रवेश करून घेतले. त्यामुळे नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजप जिल्ह्यातही करिष्मा दाखवेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती.
मात्र, या दोन मतदारसंघातील सासवडचा अपवाद वगळता भोर, फुरसुंगी, जेजुरी या तीनही पालिकांच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीने झेंडा फडकाविला. इंदापूर, माळेगाव बु. या ठिकाणीही राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष निवडून आले. त्यामुळे काँग््रेास, राष्ट्रवादीतील दिग्गज समजल्या जाणाऱ्या माजी आमदार व पदाधिकाऱ्यांना घेऊन या तीन तालुक्यात भाजपला यश मिळविता आले नाही. दौंडमध्ये राहुल कुल यांच्यासारखा ज्येष्ठ आमदार असून यश मिळविता आले नाही. भाजपला सर्वाधिक मोठा धक्का मावळ तालुक्यात बसला आहे. तळेगावची जागा भाजपने जिंकली असली तरी ती महायुतीत ठरलेल्या जागा वाटपानुसार भाजपकडे गेली आहे. मात्र, अनेक वर्षे भाजपची सत्ता असलेली लोणावळा नगरपरिषद भाजपच्या हातातून गेली आहे.
एकंदरीतच भाजपने जिल्ह्यातील नगरपरिषदांसाठी मोठी ताकद पणाला लावली होती. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार महेश लांडगे, राहुल कुल, माजी मंत्री बाळा भेगडे, माजी आमदार संजय जगताप, संग््रााम जगताप यांची राज्यातील मंत्री, नेते यांची ताकद असतानाही भाजप पुणे जिल्ह्यात अपेक्षित यश मिळवू शकला नाही. त्याचा थेट परिणाम आता तोडांवर येऊन ठेपलेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे.
या दोन्ही महापालिकांच्या निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादी काँग््रेास या दोन पक्षांमध्येच थेट लढत होण्याची शक्यता आहे. त्यातच भाजपने राष्ट्रवादीतीलच काही माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा प्रवेश घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट आव्हान दिले आहे. त्यानंतर पवार यांनी गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात तळ ठोकून मोर्चेबांधणी केली आहे. याशिवाय दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय जवळपास झाला आहे. याशिवाय महाविकास आघाडीला बरोबर घेण्याची तयारी सुरू आहे. या सगळ्या घडामोडी लक्षात घेता नगरपरिषदांप्रमाणे महापालिका निवडणुकीतही भाजप व राष्ट्रवादीत चुरशीचा सामना रंगण्याची शक्यता आहे.