

पुणे: एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग््रेास पक्ष एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (दि. 22) काँग््रेासचे विधान परिषदेतील गटनेते व पुणे जिल्ह्याचे निरीक्षक सतेज ऊर्फ बंटी पाटील यांना पुणे महापालिका निवडणुकीत आघाडी करण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महायुतीचा घटक पक्ष असलेल्या भाजपने महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग््रेास पक्षासोबत युती करणार नसल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या सर्व घडामोडींमुळे कोंडीत सापडलेल्या अजित पवार यांनी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी गोळाबेरीज करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी तातडीने हालचाली करत इच्छुकांच्या स्वतः मुलाखती घेतल्या. सोमवारी बारामती येथील हॉस्टेलमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणुकीसाठी सज्ज राहण्याच्या सूचनाही दिल्या.
दरम्यान, पुणे शहरातील काँग््रेासच्या अनेक आमदारांनीही अजित पवारांची भेट घेतली. समविचारी मतांची विभागणी टाळली गेली, तर निवडून येणे सोपे जाते, असे सांगत अजित पवार यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याचे सूतोवाच केले होते. त्याच अनुषंगाने सोमवारी दिवसभर विविध हालचाली झाल्या. त्यांच्या पक्षाचे माजी महापौर दत्ता धनकवडे यांनी स्पष्ट शब्दांत दोन्ही राष्ट्रवादी काँग््रेास पक्ष एकत्र येणार असल्याचे माध्यमांना सांगितले.
दुसरीकडे, अजित पवार यांनी काँग््रेासचे नेते सतेज पाटील यांना फोन करून पुणे महापालिकेसाठी आघाडीचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासंदर्भात शहर काँग््रेासमधील पदाधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला. दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
जि.प.सह पं.स. निवडणुकांतही मिळवणार यश
पुणे जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग््रेास पक्ष पहिल्या क्रमांकावर राहिला होता. त्यानंतर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि आमदार शंकर मांडेकर यांनी अजित पवारांची भेट घेऊन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांतही असेच यश पक्षाला मिळवून देण्याचा विश्वास व्यक्त केला.