FIR Against Dancer Nisha Mumbaiakar pudhari
पुणे

FIR Against Dancer Nisha Mumbaiakar: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

Anirudha Sankpal

FIR Against Dancer Nisha Mumbaiakar: पुण्यात दहीहंडीच्या कार्यक्रमात अश्लील गाण्यावर नृत्य करणाऱ्या नृत्यांगनांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. प्रसिद्ध नृत्यांगना राधा पाटील हिच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर आता आणखी आठ नृत्यांगनांविरोधात सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यामध्ये प्रसिद्ध नृत्यांगना निशा मुंबईकर आणि शुभांगी थोरात यांच्यासह आठ जणींचा समावेश आहे. विशेष म्हणजे केवळ नृत्यांगनाच नाही, तर कार्यक्रमाचे आयोजक आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाई केली आहे.

दहीहंडीचा उत्साह,मोठी गर्दी, आणि त्यात रंगलेला नृत्याचा कार्यक्रम. मात्र याच कार्यक्रमात अश्लील गाणी वाजवून त्यावर नृत्य केल्याचा आरोप आता संबंधित नृत्यांगनांना चांगलाच महागात पडला आहे. पुण्यातील सहकारनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी आणखी आठ नृत्यांगनांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये प्रसिद्ध नृत्यांगना निशा मुंबईकर आणि शुभांगी थोरात यांच्यासह आठ जणींचा समावेश आहे.

दहीहंडीच्या कार्यक्रमादरम्यान अश्लील गाणी वाजवून त्यावर नृत्य करण्यात आल्याचा आरोप आहे. या कार्यक्रमासाठी आवश्यक परवानग्या आणि संबंधित नियमांचे पालन करण्यात आले होते का, याबाबतही पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील कला, लोककला, चित्रपट आणि सांस्कृतिक कार्यक्रमांशी संबंधित रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाच्या नियमांनुसार आवश्यक प्रमाणपत्र घेणे गरजेचे असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसंच पुणे शहर पोलिसांकडूनही नृत्याच्या कार्यक्रमासाठी आवश्यक परवानगी घेणे अपेक्षित असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

या प्रकरणात पोलिसांनी केवळ नृत्यांगनांवरच कारवाई केलेली नाही. तर अष्टविनायक मित्र मंडळाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, तसेच रिस्की बॉईज ग्रुपचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्याविरोधातही सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हणजेच कार्यक्रमात अश्लील नृत्य सादर झाल्याप्रकरणी कलाकारांसोबतच आयोजकांनाही पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT