Gun Pudhari
पुणे

Pune Country Made Pistols Seized: सिंहगड रोड पोलिसांची मोठी कारवाई; तीन गावठी पिस्तुले, चार जिवंत काडतुसे जप्त

वडगाव बुद्रुकमध्ये दोन स्वतंत्र कारवाया; दोन १८ वर्षीय तरुणांसह विधिसंघर्षित बालक ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

पुणे: सिंहगड रोड पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवायांत तीन गावठी पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली. या कारवाईत दोन १८ वर्षीय तरुणांसह एका विधिसंघर्षित बालकाकडून गावठी पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ ऑगस्ट रोजी पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, आरोपी ओमकार ऊर्फ दाद्या अशोक पांढरे (वय १८, रा. सिंहगड कॅम्पस, वडगाव बुद्रुक) आणि सुरज ऊर्फ चिक्या संतोष गायकवाड (वय १८, रा. जाधवनगर, वडगाव बुद्रुक) हे वडगाव बुद्रुक परिसरातील पठार भागात गावठी पिस्तूल व काडतुसे घेऊन थांबले असल्याचे समजले.

पोलिसांनी तेथे जाऊन दोघांना ताब्यात घेतले. अंगझडतीमध्ये ओमकार पांढरे याच्याकडून सुमारे ४० हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस, तर सुरज गायकवाड याच्याकडून गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस मिळून आले. याप्रकरणी दोघांविरुद्ध सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, १९ ऑगस्ट रोजी सिंहगड रोड पोलिसांच्या पेट्रोलिंग पथकाला विधिसंघर्षित बालक वडगाव बुद्रुक येथील प्रवेशद्वाराजवळील वॉकिंग ट्रॅकवर थांबलेला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्याला ताब्यात घेतले. पंचांसमक्ष केलेल्या झडतीत त्याच्याकडून सुमारे ४० हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर, समीर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण कुलकर्णी, संतोष भांडवलकर, सचिनकुमार तरडे, कर्मचारी उत्तम तारी, अण्णा केकान, सतीश मोरे, विकास बांदल यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सचिनकुमार तरडे करीत आहेत. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रवीण कुलकर्णी करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT