Pune Civic Issues Pudhari
पुणे

Pune Civic Issues: नव्या राज्यकर्त्यांवर वाढणार अपेक्षांचे ओझे

आरोग्य, पाणी, कचरा, वाहतूक या मूलभूत प्रश्नांवरच पुणेकरांचा भर; ‘इतके दिले तरी भरून पावलो’

पुढारी वृत्तसेवा

पुणे : नव्वदीच्या दशकापर्यंत पुण्याचा आकार, लोकसंख्या मर्यादित होती. त्यामुळे महापालिकेच्या आवाक्यात सगळी कामे होती. मात्र, 32 पेक्षा जास्त गावांचा समावेश या शहरात झाला आणि पुण्याचे क्षेत्रफळ मुंबईपेक्षा जास्त झाल्याने नियोजनाचा बोजवारा उडाला. नागरिकांना पायाभूत सुविधा पुरविणे महापालिकेला जड जाऊ लागले. वास्तविक पुणे शहर सांस्कृतिक आणि शिक्षणाची पंढरी असल्याने दरवर्षी शहरात बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे रस्ते, पाणी, कचरा आणि आरोग्य या मूलभूत गरजा तरी महापालिकेने पुरवाव्यात एवढीच पुणेकरांची माफक मागणी महापालिकेकडून आहे.

पुढारीकडे व्यक्त केलेल्या जाहीरनाम्यातूनच याचे पडसाद उमटले आहेत.

पुढारीच्या व्यासपीठावर नागरिकांचा जाहीरनामा या सदरातून दैनिक ‌’पुढारी‌’ने सामान्य नागरिकांना बोलते केले. त्यावेळी विविध क्षेत्रांतून मान्यवरांसह सामान्य पुणेकरांनी आपल्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत अपेक्षा व्यक्त केल्या. यात कायदा, व्यापार, सांस्कृतिक, सार्वजनिक वाहतूक, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य यांसह समाविष्ट गावांतील नागरिकांनी आपल्या अपेक्षा पोटतिडकीने मांडल्या. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीआधीच ‌’पुढारी‌’च्या माध्यमातून जनतेने नव्या महापालिकेतील कारभाऱ्यांपुढे जनतेने त्यांच्या मनातला जाहीरनामाच सादर केला.

कायदा क्षेत्राला हवीत पायाभूत सुविधांसह अन्य विकासकामे

स्वच्छतेचा प्रश्न गंभीर

पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही

अनधिकृत पार्किंगला आळा घालण्यासाठी न्यायालयातील पार्किंग सुविधेत वाढ अपेक्षित

वस्तीपातळीवर मोफत कायदेविषयक सल्ला केंद्र उभारावे

अतिक्रमणाच्या विळख्यातील बाजारपेठांची सोडवणूक करावी

व्यापाऱ्यांच्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घ्यावी

वाहतूक कोंडीच्या विळख्यातून सुटका करावी

इंदोरच्या धर्तीवर बाजारपेठा स्वच्छ कराव्यात

व्यापार, व्यावसायिकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी नियमित चर्चेची गरज

महापालिकेपेक्षा ग्रामपंचायत बरी होती... समाविष्ट गावे नागरी सुविधांपासून अजूनही कोसो दूर

नागरिकांसह पदाधिकाऱ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया

रस्ते, वीज, पाणी, आरोग्यसुविधा अजूनही नाहीत

वाड्या, वस्त्यांमध्ये विकासकामांची वानवा

टी.पी. योजना की, पीएमआरडीए या गोंधळात विकास खुंटला

मोकळ्या जागांवर क्रिडांगणे उभारावीत

शालेय वयोगटात खेळ अनिवार्य करणे

मनपा आणि शाळांमधील समन्वय आवश्यक

महापौर चषकाचा राष्ट्रीय स्तरावर विस्तार करावा

प्रत्येक प्रभागात क्रीडा समित्या स्थापन कराव्यात

आंतरराष्ट्रीय स्पर्धांना जाणाऱ्या खेळाडूंना अर्थसाह्य करावे

मनपाच्या मोकळ्या जागेवर क्रीडांगणे उभारावीत.

सांस्कृतिक धोरणाचे प्रतिबिंब जाहीरनाम्यात उमटावे

नाट्यगृहांच्या दुरुस्ती देखभालीसाठी हवा स्वतंत्र निधी

शहरासाठी वेगळे सांस्कृतिक धोरण हवे

राजकीय पक्षांनी नवनव्या घोषणा करण्याऐवजी दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेवर भर द्यावा

साहित्य क्षेत्राला उभारी घेता येईल असे वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे

पुण्याच्या सांस्कृतिक क्षेत्राला जागतिक पातळीवर न्यावे

लोककलांच्या वाढीला चालना देण्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करावी

सार्वजनिक वाहतुकीला हवा निधीचा ‌‘बूस्टर‌’

सार्वजनिक वाहतूक मजबूत करण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज

सुरक्षित हवाई क्षेत्रासाठी कठोर नियंत्रण गरजेचे

रेल्वेच्या विकास व विस्तारासाठी निधीची तरतूद आवश्यक

रिक्षा व टॅक्सीसेवांचे जाळे विस्तारण्याची आवश्यकता

सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेचे बळकटीकरण व्हावे

आरोग्यासाठीची तरतूद अगदीच नगण्य

बोगस डॉक्टरांना पायबंद घालण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज

महापालिकेने स्वतःचे दवाखाने उभारावेत

सार्वजनिक आरोग्यसेवेवरील ताण कमी करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ व औषधे पुरवावीत.

दिव्यांगाच्या उपचारासाठी स्वतंत्र व्यवस्था हवी

नियोजनशून्य व्यवस्थापनाने कचऱ्याचा प्रश्न बिकट

कचरा जागेवर जिरवण्यासाठी कडक धोरणाची गरज

कचरा संकलनाची एकसंघ पद्धत स्वीकारावी

कचरा निर्मूलन प्रकल्पांची श्वेतपत्रिका जाहीर करावी

शिक्षणात आमूलाग्र बदलाची अपेक्षा

नव्या नगरसेवकांनी शाळा दत्तक घेऊन त्यांचा विकास करावा

शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी खासगी कंपन्यांची मदत घ्यावी

महापालिका शाळेत कौशल्यशिक्षण आणि उच्चशिक्षण उपलब्ध करावे

प्रयोगशाळा बंधनकारक करावी

झोपडपट्टीवासीयांच्या विकासावर लक्ष हवे

वस्तीपातळीवरील मूलभूत प्रश्नांची सोडवणूक व्हावी

झोपडपट्‌‍ट्यांचा पुनर्विकास करताना तेथील सोयी-सुविधांवर येणाऱ्या ताणाचाही विचार व्हावा

वस्त्यांवरील स्वच्छतागृहे अधिक स्वच्छ राहण्यासाठी योग्य व्यवस्थापनाची गरज

कचरावेचकांच्या समस्या प्राधान्यक्रमाच्या यादीत याव्यात

कष्टकरी महिलांच्या लघुउद्योगांना आधार मिळावा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT