पुणे: राज्यातील डाळिंबाचा संपलेला हंगाम आणि परराज्यातून होत असलेला कमी पुरवठा यामुळे बाजारात डाळिंबाची आवक घटली आहे. त्यातुलनेत मागणी मोठी असल्याने डाळिंबाच्या भावात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी बाजार बंद असल्याने डाळिंबाची आवक वाढली होती. मात्र, आवकसह मागणीही वाढल्याने ही दरवाढ झाल्याचे डाळिंबाचे व्यापारी सिध्दार्थ खैरे यांनी सांगितले.
रथसप्तमीमुळे सोलापूर भागातील बोरांना मागणी वाढली आहे. यामध्ये, चेकनटला सर्वाधिक मागणी आहे. याखेरीज, मोसंबी, पेरू आणि लिंबानाही चांगली मागणी राहिल्याने त्यांच्याही भावात वाढ झाल्याचे सांगण्यात आले. गुलटेकडी येथील मार्केट यार्ड येथील
फळबाजारात रविवारी (दि. 25) मोसंबीची 40 ते 50 टन, संत्रा 40 ते 50 टन, डाळिंब 15 ते 20 टन, पपई 9 ते 10 टेम्पो, लिंबाची सुमारे दीड ते दोन हजार गोणी, कलिंगड 10 ते 12 टेम्पो, खरबूज 8 ते 10 टेम्पो, चिक्कू 2 हजार गोणी, पेरु 300 तर 350 क्रेट, अननस 6 ट्रक, बोरे 300 ते 350 पोती, इतकी आवक झाली होती, अशी माहिती मार्केटयार्डातील व्यापाऱ्यांनी दिली.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे:
लिंबे (प्रतिगोणी) : 250-450, मोसंबी : (3 डझन) : 180-500, (4 डझन) : 30-270, संत्रा : (10 किलो) : 200-1000, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : 100-300, आरक्ता : 20-80, गणेश : 10-40, कलिंगड : 15-20, खरबूज : 12- 30, पपई : 12-25, चिक्कू (दहा किलो) : 100-600, पेरु (20 किलो) : 600-700, अननस (1 डझन): 100-600, बोरे (10 किलो) : चमेली 550-620, चेकनट 1300-1400, उमराण 180-250, चण्यामण्या 1000-1200.