

पुणे: मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीचे पडघम वाजले असून, तब्बल 9 वर्षांच्या कालावधीनंतर निवडणुका होत असल्याने पुन्हा एकदा आजी-माजी जिल्हा परिषद सदस्यांनी दंड थोपटले आहेत. अनेक दिग्गज निवडणूक रिंगणात उतरल्याने पुन्हा एकदा ग््राामीण भागात निवडणुकीचा ज्वर शिगेला पोहचला आहे. अनुभवी चेहऱ्यांसह काही नव्या समीकरणांमुळे जिल्ह्यातील निवडणूक लढती अधिक रंगतदार होणार आहेत.
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यात आले आहेत. एकूण 598 जण निवडणूक रिंगणात आहेत. अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी असून, यातील आणखी काही उमेदवार गळण्याची शक्यता आहे. 9 वर्षांनी निवडणूक होत असल्याने या निवडणुकीला रंगत येणार आहे. महापालिका निवडणुकांप्रमाणे अनेक लढती चुरशीच्या होणार आहेत. या निवडणुकीत अनेक माजी सदस्यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. यात काही माजी सभापती व पदाधिकारी यांनी विविध गटांतून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
माजी उपाध्यक्ष रणजित शिवतारे यांनी राष्ट्रवादी कॉंग््रेास पक्षाकडून भोर तालुक्यातील उत्रौली-कारी या जिल्हा परिषदेच्या गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर, भाजपच्या आशा बुचके जुन्नर तालुक्यातील सावरगाव-कुसूर गटातून निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे गुलाब पारखे निवडणूक रिंगणात आहेत. तर, आंबेगाव तालुक्यातील पारगाव तर्फे अवसरी गटातून राष्ट्रवादी काँग््रेासकडून माजी उपाध्यक्ष व माजी मंत्री व आमदार दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील हे निवडणूक लढवत आहेत. तर, तुलसी भोर ह्या कळंब-चांडोली गटातून रिंगणात आहेत.
माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी तसेच कृषी पशुसंवर्धन विभागाच्या माजी सभापती सुजाता पवार ह्या राष्ट्रवादी काँग््रेासकडून वडगाव-मांडवगण गटातून निवडणूक लढवत आहेत. भोलावडे शिंद गटातून विठ्ठल आवळे हे भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. दत्ता झुरंगे हे बेलसर गटातून काँग््रेास पक्षाकडून निवडणूक लढवत असून, वीरधवल जगदाळे हे दौंड तालुक्यातील खडकी-देऊळगावराजे गटातून राष्ट्रवादी काँग््रेास पक्षाकडून मैदानात उतरले आहेत. इंदापूर तालुक्यातील बावडा गटातून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या तसेच ठाकरे घराण्याची सून अंकिता पाटील ह्या दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादी काँग््रेासकडून रेखा बांदल या रांजणगाव सांडस गटातून, तर जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती पूजा पारगे ह्या खेड-शिवापूर-खानापूर गटातून निवडणूक लढवत आहेत.
चुरशीच्या लढतींकडे लक्ष
अनुभवी माजी सदस्यांची मोठी फौज पुन्हा मैदानात उतरल्याने यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीत चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या लढती पाहायला मिळणार आहे. पुणे महापालिकेत भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. आता जिल्ह्याच्या राजकरणातही राष्ट्रवादी कॉंग््रेास पक्षाशी लढत होणार असल्याने या निवडणुकांत देखील अजित पवार यांना शह देण्याची रणनीती भाजपने आखली आहे. या निवडणुकांत कोण बाजी मारणार? हे 7 फेबुवारीला स्पष्ट होणार आहे.