Illegal Plotting Action Pudhari
पुणे

Illegal Plotting Action: अनधिकृत ‌‘प्लॉटिंग‌’वर कारवाईचा धडाका

‌‘पुढारी‌’च्या दणक्यानेे प्रशासन हलले; पुरंदर विमानतळाच्या झोनमध्ये पीएमआरडीएची आता मोहीम

पुढारी वृत्तसेवा

पुणे : पुरंदरमधील अनधिकृत प्लॉटिंगविरोधात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) च्या वतीने कारवाई सुरू करण्यात आली असून, ‌‘पुढारी‌’च्या बातमीची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे. गेल्या दोन दिवसांत तीन गावांमध्ये कारवाई केली. या कारवाईमुळे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे हद्दीमध्ये होणाऱ्या अनधिकृत प्लॉटिंगला आळा बसणार आहे. तसेच, अनधिकृत प्लॉटिंगवर कारवाई सुरूच राहणार असल्याचे सहआयुक्त डॉ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील यांनी सांगितले.

अनधिकृत प्लॉटिंगमुळे नागरिकांची फसवणूक होत असल्याने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे कार्यालयास अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत प्राधिकरणामार्फत मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अनुषंगाने पुरंदर तालुक्यातील 15 गावांचे सर्वेक्षण पूर्ण केले असून, त्यानुसार अनधिकृत प्लॉटिंगविरोधात कारवाई सुरू आहे. गेल्या दोन दिवसांत तीन गावांत कारवाई झाली. त्यात देवडी, गट क्र. 170, शंकर बाठे, मौजे आंबोडी गट क्र. 159, निखिल बोरकर व यशोदीप बोरकर, मौजे काळेवाडी गट क्र. 1706, गुलाब झेंडे / कातोबा डेव्हलपर्स (गणेश पार्क) मधील प्लॉटिंग, अंतर्गत रस्ता व डिमार्केशन पोल यावर निष्कासन कारवाई केली आहे. ही कारवाई महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला तसेच पोलिस अधीक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनात सहआयुक्त डॉ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील व उपायुक्त किरणकुमार काकडे, तहसीलदार आशा होळकर आणि शाखा अभियंता प्रीतम चव्हाण, शशिभूषण होले, शरद खोमणे, हरीश माने, प्रमोद सोनवणे व संकेत बडे यांनी पार पाडली आहे.

कारवाईमुळे बेकायदा प्लॉटिंगला आळा बसेल

या कारवाईमुळे पीएमआरडीए हद्दीत होणाऱ्या अनधिकृत प्लॉटिंगला आळा बसेल. बेकायदेशीर अनधिकृत प्लॉटिंग म्हणजे शासनाकडील कोणतीही बिनशेती परवानगी न घेता, ले-आऊट करून फक्त तात्पुरते रस्ते दाखवले जातात. त्यामध्ये सदर जागेचा ले-आऊट नकाशा मंजूर करून घेतला जात नाही, त्यामुळे अशा प्लॉट्‌‍सना बांधकाम परवानगी मिळत नसल्याने प्लॉट खरेदी करण्यापूर्वी आवश्यक ती सर्व कागदपत्रे तपासूनच नागरिकांनी गुंतवणूक करावी, असे आवाहन सहआयुक्त डॉ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील यांनी केले आहे. नागरिकांची फसवणूक होऊ नये, याकरिता बेकायदेशीर प्लॉटिंगबाबत सावधगिरी बाळगण्यास देखील त्यांनी सांगितले.

अशी आहे सद्य:स्थिती

विमानतळ बाधित क्षेत्रातील 1) शिवजल ग््रुाप आणि निर्माण ग््रुाप - वनपुरी, गट नं. 18 - स्वतःहून काढून घेतले (अंदाजे 33 एकर)

विजय मनोहर रायकर- उदाचीवाडी, गट नं. 350 - स्वतः काढून घेतले (अंदाजे 2 एकर) तालुक्यातील इतर गावे

निखिल बोरकर यशदीप बोरकर- अंबोडी, गट नं. 159 - कारवाई केली (अंदाजे 2.5 एकर)

गौरव बडधे - पवारवाडी, गट नं. 295-स्वतः काढून घेतले (अंदाजे 3 एकर)

शुभम झेंडे / अनिकेत झेंडे- दिवे, गट नं. 1708 - स्वतः काढून घेतले (अंदाजे 1 एकर)

वैभव झेंडे (कातोबा डेव्हलपर्स (गुलाब झेंडे)- दिवे, गट नं. 1706 - कारवाई करण्यात आली (अंदाजे 2 एकर)

सौरभ शेखर कुंजीर - झेंडेवाडी, गट नं. 31 - स्वतः काढून घेतले (अंदाजे 3.5 एकर) 6) शंकर बाठे - देवडी, गट नं. 170 - कारवाई करण्यात आली (अंदाजे 5.5 एकर) विमानतळ बाधित क्षेत्रातील शिवजल ग््रुाप आणि निर्माण ग््रूाप - वनपुरी, गट नं. 18 - स्वतः काढून घेतले (अंदाजे 33 एकर) 2) विजय मनोहर रायकर- उदाचीवाडी, गट नं. 350 - स्वतः काढून घेतले (अंदाजे 2 एकर)

निखिल बोरकर यशदीप बोरकर- अंबोडी, गट नं. 159 - कारवाई करण्यात आली (अंदाजे 2.5 एकर)

गौरव बडधे - पवारवाडी, गट नं. 295 - स्वतःहुन काढून घेतले (अंदाजे 3 एकर) 3) शुभम झेंडे / अनिकेत झेंडे-दिवे, गट नं. 1708 - स्वतःहून काढून घेतले (अंदाजे 1 एकर)

वैभव झेंडे (कातोबा डेव्हलपर्स (गुलाब झेंडे)- दिवे, गट नं. 1706 - कारवाई करण्यात आली (अंदाजे 2 एकर) 6) सौरभ शेखर कुंजीर - झेंडेवाडी, गट नं. 31-स्वतःहून काढून घेतले (अंदाजे 3.5 एकर)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT