Result Pudhari
पुणे

PMC Junior Engineer Result: पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरतीचा निकाल जाहीर; हजारो उमेदवारांना दिलासा

१६९ जागांसाठी झालेल्या परीक्षेचा निकाल संकेतस्थळावर प्रसिद्ध; गुणपत्रिकेवर क्यूआर कोडद्वारे पडताळणीची सुविधा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग-३ या पदाच्या एकूण १६९ जागांसाठी घेतलेल्या भरती परीक्षेचा निकालअखेर मंगळवारी जाहीर करण्यात आला आहे. महापालिकेने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल प्रसिद्ध केला असून, गेल्या अनेक महिन्यांपासून निकालाची वाट पाहणाऱ्या हजारो उमेदवारांची प्रतीक्षा आता संपली आहे.

महापालिकेत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या १६९ जागांसाठी दोन वेळा रखडलेली भरती परीक्षा राज्यातील सात केंद्रांवर २२, २३ आणि २९ एप्रिलला पार पाडली. एकूण ७ सत्रांमध्ये ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी ४२ हजार उमेदवारांनी अर्ज भरले होते. मात्र, २०,७३५ उमेदवारांनी ही परीक्षा दिली.

आयबीपीएस या देशातील देशांतर्गत नामांकित संस्थेमार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती. हा निकाल कधी लागणार या प्रतीक्षेत उमेदवार होते. अखेर आज निकाल महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला असून, https://www.pmc.gov.in/ यावर हा निकाल पाहता येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या प्रमुख किशोरी शिंदे यांनी दिली.

गुणपत्रकावर 'क्यूआर कोड'ची सुरक्षा!

निकाल प्रक्रियेत पारदर्शकता राहावी आणि कोणत्याही प्रकारची बनावटगिरी किंवा फसवणूक होऊ नये, यासाठी महानगरपालिकेने या निकालपत्रावर एक विशेष सुरक्षित 'क्यूआर कोड' लावला आहे. या क्यूआर कोडच्या माध्यमातून उमेदवारांना आपल्या निकालाची सुरक्षितता आणि अधिकृतता तत्काळ पडताळून पाहता येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT