पुणे

कचर्‍यावर वृक्षारोपण; स्वच्छतेबाबत जनजागृती : आरोग्य विभागाचा उपक्रम

Laxman Dhenge

विश्रांतवाडी : पुढारी वृत्तसेवा : टिंगरेनगर येथील एकतानगर चौकातील वळणावर नागरिकांकडून मोठ्याप्रमाणात कचरा टाकण्यात येतो. याबाबत नागरिकांकडून तक्रारी येत होत्या. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने वृक्षारोपण करून रांगोळी काढून परिसर स्वच्छ व सुंदर केला आहे. तसेच, स्वच्छतेबाबत जनजागृतीही करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी कचरा टाकण्याची नागरिकांची सवय आहे. वारंवार उपाययोजना करूनही नागरिक येथे कचरा टाकतात.

काही नागरिकांनी या ठिकाणी राडारोडाही टाकला होता. परिसरातील नागरिकांकडून याबाबत वारंवार तक्रारी येत असल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने येथे नुकतेच वृक्षारोपण करून रांगोळ्या काढल्या. बॅनर लावून नागरिकांना कचरा न टाकण्याबाबत सूचना केल्या आहेत. वरिष्ठ आरोग्य निरीक्षण स्वप्नील कुताळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

एकतानगर चौकातील राडारोडा उचलण्यात आला आहे. लवकरच या ठिकाणी एक कर्मचारी नियुक्त करून कचरा टाकणार्‍या नागरिकांना पाचशे रुपये दंड करण्यात येणार आहे.

-अमोल म्हस्के, आरोग्य निरीक्षक.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT