पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : ख्रिश्चन बांधवांचे श्रध्दास्थान असलेल्या येशू ख्रिस्त यांचा बलिदान दिन म्हणजेच गुड फ्रायडे. यानिमित्त शुक्रवार (दि. 15) रोजी शहरातील पिंपरी, निगडी, चिंचवड, आकुर्डी, दापोडी, पिंपळे सौदागर व बोपोडी येथील चर्चमध्ये प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते.
कोरोनाचे निर्बंध संपल्याने दोन वर्षानंतर प्रथमच गुड फ्रायडे निमित्त चर्चमध्ये प्रार्थनेसाठी मोठ्या संख्येने भाविक जमले होते. पिंपरी येथील चर्चमध्ये सकाळपासूनच प्रार्थनेसाठी ख्रिश्चन बांधव आले होते.
प्रार्थनेनंतर दुःख सहनविधी मराठी, हिंदी व इंग्रजी या तिन्ही भाषेत वाचून दाखविण्यात आला. त्यानंतर ख्रिश्चन बांधव-भगिनींनी क्रुसाचे दर्शन केले.
नंतर पवित्र प्रसाद विधी पार पडला. गु्रडफ्रायडेनिमित्त शहरातील विविध चर्चमध्ये प्रार्थना, प्रवचनांसह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.